Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात दहावीचा 95.81 टक्के निकाल

यंदाही मुलींचीच बाजी कोकण विभाग पुन्हा अव्वल

पुणे ः राज्यात दहावीच्या विकालात 1.78 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. यंदा दहावीचा निकाल 95.81 टक्के लागला आहे. यंदाही मुलींनीच पुन्हा एकदा दह

बारसू’चे जिद्दी आंदोलन !
कोपरगाव शहरात विजेचा खेळखंडोबा
राष्ट्रवादी मुद्यावरून गुद्द्यावर आली, पडळकरांचा पुन्हा हल्लाबोल

पुणे ः राज्यात दहावीच्या विकालात 1.78 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. यंदा दहावीचा निकाल 95.81 टक्के लागला आहे. यंदाही मुलींनीच पुन्हा एकदा दहावीच्या निकालात बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 187 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. यंदा राज्यातील 15 लाख 49 हजार 326 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील यंदा 95.81 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल 1.98 टक्क्यांनी वाढला. राज्यात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली. कोकण विभागाचे 91.01 टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर यंदा नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला. नागपूरप विभागातील 94.73 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्य मंडळाच्या 9 विभागीय मंडळाकडून 1 ते 26 मार्च दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आली. यंदाही काही विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षा दिली. राज्यातील एकूण 9 विभागीय मंडळाकडून 25,894 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 25, 368 विद्यार्थी प्रत्यक्ष प्ररीक्षेत प्रविष्ट झाले. त्यापैकी 20,403 विद्यार्थी परीक्षा पास झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा निकाल 80.42 टक्के इतका लागला आहे. सर्व विभागीय मंडळाकडून नियमीत मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ही 97. 21 टक्के इतकी आहे. मुलांची 94.56 टक्केवारी इतकी आहे. त्यामुळे यंदाही मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली आहे. यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 5,58,021 विद्यार्थ्यांना 75 टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. यावर्षी राज्यामधील 81 हजार 991 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. 5 लाख 58 हजार 21 विद्यार्थ्यांना 75 टक्क्यांहून जास्त गुण मिळाले आहेत. शंभर टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या गुणांचा लाभ मिळाला होता, अशी माहिती राज्य मंडळाने दिलेली आहे. लातूर विभागीय मंडळात लातूर, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांतील 408 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. 1 लाख चार हजार 503 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.त्यातील 99 हजार 517 विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेत. लातूर विभागाचा निकाल 95.27 टक्के जाहीर झाला आहे.

विभागनिहाय निकाल
पुणे – 96.44 टक्के
नागपुर – 94.73 टक्के
छत्रपती संभाजीनगर – 95.19 टक्के
मुंबई – 95.83 टक्के
कोल्हापूर – 97.45 टक्के
अमरावती – 95.58 टक्के
नाशिक – 95.28 टक्के
लातूर – 95.27 टक्के
कोकण – 99.01 टक्के

लातूरच्या 123 विद्यार्थ्यांना मिळाले शंभर टक्के – राज्यात दहावीच्या निकालात पुन्हा एकदा लातूर पॅटर्न गाजतांना दिसून येत आहे. कारण यंदा लातूरच्या 123 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. राज्यात एकूण 187 विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळविले आहेत. त्यातील 123 विद्यार्थी हे लातूर विभागातील आहे. त्यामुळे आता लातूर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण लातूरच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. मागील वर्षी 2023 मध्ये राज्यामधील 151 विद्यार्थ्यांना शंभर टक्के मिळाले होते. त्यापैकी 108 विद्यार्थी लातूरमधील होते. 2022 मध्ये राज्यातील 122 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले होते. त्यापैकी 70 विद्यार्थी लातूरमधील होते. यंदाही लातूरच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या निकालाची परंपरा कायम राखल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS