Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत-जामखेडच्या रस्त्यांसाठी 93 कोटींचा निधी

आ. प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे निधी मंजूर

कर्जत : कर्जत व जामखेड या दोन तालुक्यातील रस्त्यांची कामे मार्गी लागावीत यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांचा सातत्याने सरकारकडे पाठपुरावा सुरु असतो

यश जाजू सी.ए. परीक्षा उत्तीर्ण
अखेर कामगार वसाहतीतील वीजपुरवठा सुरळीत
शेवगाव-पाथर्डीत लोकसभा निवडणूकीची पुर्वतयारी पूर्ण

कर्जत : कर्जत व जामखेड या दोन तालुक्यातील रस्त्यांची कामे मार्गी लागावीत यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांचा सातत्याने सरकारकडे पाठपुरावा सुरु असतो. या पाठपुराव्याला आणखीन एक मोठे यश मिळाले आहे. महायुती सरकारने अर्थसंकल्पीय (पावसाळी) अधिवेशनात रस्त्यांच्या कामांसाठी 93 कोटी 55 लाख रूपयांच्या भरीव निधीस मंजुरी दिली आहे. आमदार प्रा. राम शिंदे यांनी रस्त्यांच्या कामासाठी भरिव निधी खेचून आणल्यामुळे मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघात दळणवळणाच्या सुविधा अधिक गतीमान व्हाव्यात यासाठी आमदार प्रा राम शिंदे हे नेहमीच आग्रही राहिले आहेत. ’गाव तिथे रस्ता, वाडी तिथे रस्ता’ व्हावा,  यासाठी आमदार शिंदे हे सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करत असतात. आजवर त्यांनी रस्त्यांच्या कामांसाठी करोडो रूपयांचा निधी खेचून आणला आहे. त्यामुळे मतदारसंघात रस्त्यांचे मजबुत जाळे निर्माण झाले आहे. मतदारसंघातील काही भागातील रस्त्यांचे प्रश्‍न प्रलंबित होते. त्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी आमदार शिंदे यांचा सरकारकडे पाठपुरावा सुरु होता. अखेर या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. अर्थसंकल्पीय पावसाळी अधिवेशनात सरकारने कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी तब्बल 93 कोटी 55 लाख रूपयांचा भरघोस निधी मंजुर केला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील 25 रस्त्यांसाठी 93 कोटी 55 लाख रूपयांच्या भरीव निधीस महायुती सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. यामध्ये जामखेड तालुक्यातील 8 रस्त्यांसाठी 07 कोटी 20 लाख तर कर्जत तालुक्यातील 17 रस्त्यांसाठी 86 कोटी 35 लाख रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. अर्थसंकल्पीय पावसाळी अधिवेशनातून आमदार शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे. आमदार शिंदे यांच्या विकासात्मक धोरणामुळे मतदारसंघातील रस्त्यांमध्ये सातत्याने अमूलाग्र बदल झाल्याचे दिसत आहे. रस्त्यांची अनेक कामे झाली असून काही कामे सुरु आहेत. तर काही कामांचा पाठपुरावा सुरु असून लवकरच याही कामांना मंजुरी मिळून रस्त्यांचे प्रश्‍न मार्गी लागणार आहेत. अर्थसंकल्पीय पावसाळी अधिवेशनात ज्या रस्त्यांची कामे मंजुर झाली आहेत, त्या कामांना निधी द्यावी अशी मागणी या भागातील जनतेकडून सातत्याने होत होती, या मागणीची दखल घेऊन आमदार प्रा.राम शिंदे यांनी सरकारकडे जोरदार पाठपुरावा करत निधी मंजुर करून आणला आहे. महायुती सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात रस्त्यांच्या कामांसाठी 93 कोटींचा निधी मंजुर केला आहे. या निधीतून ग्रामीण भागातील दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा निर्माण होणार आहेत. मजबुत व पक्क्या रस्त्यांच्या निर्माणामुळे अपघाताच्या घटना रोखल्या जाणार आहेत. यामुळे जनतेकडून आमदार प्रा राम शिंदे व महायुती सरकारचे आभार मानले जात आहे.

रस्त्यांचे प्रश्‍न मार्गी लागल्यास स्थानिक व्यापारी, विद्यार्था, शेतकरी, व्यावसायिकांसह स्थानिक बाजारपेठेला याचा मोठा फायदा होतो, त्यामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात रस्त्यांचे मजबुत जाळे निर्माण व्हावे यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. मतदारसंघातील प्रत्येक गाव पक्क्या रस्त्याने जोडले जावे यासाठी आजवर करोडो रूपयांचा निधी खेचून आणला आहे. अजूनही अनेक महत्वाची कामे मार्गी लावायची आहेत त्यासाठी माझा सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. सरकारने भरघोस निधी मंजुर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व महायुती सरकारचे मनापासून आभार
प्रा. राम शिंदे, आमदार

COMMENTS