Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिंपरी चिंचवड महापालिकेला मालमत्ता करातून 910 कोटी तिजोरीत

पुणे: पिंपरी चिंचवड महापालिका तिजोरीत मालमत्ता करातून 910 कोटी रुपये जमा झाले आहेत. एक हजार कोटी रुपयांचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी शेवटच्या तीन दि

बेमुदत संपावरील 15 हजारावर कर्मचार्‍यांना व्हॉटसअ‍ॅप नोटीस
धक्कादायक…कंटेनरच्या धडकेत एस टी चालक ठार (Video)
रशियात गृहयुद्धाचा भडका

पुणे: पिंपरी चिंचवड महापालिका तिजोरीत मालमत्ता करातून 910 कोटी रुपये जमा झाले आहेत. एक हजार कोटी रुपयांचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी शेवटच्या तीन दिवसांत 90 कोटी वसूल करण्याचे आव्हान कर संकलन विभागापुढे असणार आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार सकाळी साडेनऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत कर संकलन कार्यालये खुली राहणार आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी 17 विभागीय कार्यालये आणि ऑनलाइनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत 910 कोटी रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. एक हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, नळजोड खंडित करणे, जप्त मालमत्तांचा लिलाव यासारख्या कारवाया केल्या जात आहेत. 29 मार्च शुक्रवारी गुड फ्रायडे आणि शनिवार, रविवार महापालिकेला शासकीय सुट्टी आहे. मात्र, या तिन्ही दिवशी नागरिकांच्या सोयीसाठी कर संकलन कार्यालये सकाळी साडेनऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना कराचा भरणा करता येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली. आत्तापर्यंत औद्योगिक चार हजार 395, निवासी चार लाख 26 हजार 530, बिगरनिवासी 44 हजार 554, मिश्र 12 हजार 432, मोकळ्या जमिनी 4 हजार 416 अशा चार लाख 92 हजार 422 जणांनी कराचा भरणा केला आहे. ऑनलाइन 513 कोटी 58 लाख, रोखीत 131 कोटी 24 लाख, धनादेशाद्वारे 147 कोटी 17 लाख, इडीसी 12 कोटी 93 लाख, आरटीजीएस 43 कोटी 20 लाख, धनाकर्ष (डिमांड ड्रॅाफ्ट) आठ कोटी 12 लाख, विविध उपयोजन सहा कोटी 93 लाख आणि इनइफ्टीद्वारे सहा कोटी 83 लाख रुपये जमा झाले आहेत.

COMMENTS