Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 9 जवान शहीद

विजापूर : गेल्या काही दिवसांपासून नक्षलवाद्यांचा बिमोड होत असतांना आणि अनेक नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवत आत्मसमर्पण केले असले तरी, छत्तीसगडमध्

यंदा उष्णतेने मोडला 122 वर्षांचा ’रेकॉर्ड’
मनोज जरांगे यांच्या दौर्‍याचा चौथ्या टप्पा 1 डिसेंबरपासून
एक-दोन नव्हे ‘अवतार’चे तब्बल चार सिक्वेल येणार

विजापूर : गेल्या काही दिवसांपासून नक्षलवाद्यांचा बिमोड होत असतांना आणि अनेक नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवत आत्मसमर्पण केले असले तरी, छत्तीसगडमध्ये नक्षलवादी अजूनही सक्रिय दिसून येत आहेत. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी जवानांच्या वाहनावर हल्ला केला असून त्यामध्ये 9 जवान शहीद झाले असून या स्फोटात गाडीचालकाचा देखील मृत्यू झाला आहे. नक्षलवाद्यांनी याठिकाणी अगोदरच भूसुरुंग पेरले होते. या भूसुरुंगाच्या ठिकाणी जवानांचे वाहन येताच नक्षलवाद्यांनी तत्काळ त्याचा स्फोट केल्याची माहिती आहे.
दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूरमधील संयुक्त कारवाईनंतर सैनिक परतत होते. सोमवारी दुपारी 2.15 च्या सुमारास, विजापूरच्या कुत्रु पोलिस स्टेशन हद्दीतील आंबेली गावाजवळ अज्ञात नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटाने सुरक्षा दलाचे वाहन उडवले. बस्तर रेंजच्या आयजींनी स्फोटाला दुजोरा दिला आहे.

COMMENTS