Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील 100 सर्वाधिक कृषी पंप थकबाकीदारांकडे 9.28 कोटी थकित; थकबाकी कृषीपंप साखर पट्ट्यातील

मुंबई / प्रतिनिधी : महाराष्ट्रात कृषी ग्राहक वीज पुरवठादारांची थकबाकी ही 42 हजार कोटी रुपयांच्यावर पोहचली असून त्यात सर्वाधिक थकबाकी असलेल्या 100 व्य

क्रांतिकारकांनी जातीयवादी शक्तींना थारा दिला नाही : आ. जयंत पाटील
श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन; सातारा शहरावर दु:खाचा डोंगर
ओमायक्रॉनच्या संसर्गामुळे येऊ शकते तिसरी लाट

मुंबई / प्रतिनिधी : महाराष्ट्रात कृषी ग्राहक वीज पुरवठादारांची थकबाकी ही 42 हजार कोटी रुपयांच्यावर पोहचली असून त्यात सर्वाधिक थकबाकी असलेल्या 100 व्यक्ती वा संस्थांकडे 9.28 कोटींहून अधिक रक्कम थकित आहे. राज्यातील सर्वाधिक कृषी पंप थकबाकी हे पुणे जिल्ह्यातील सायगाव येथील शेतकरी सुभकांत पंढरीनाथ काळे यांच्याकडे असून त्या खालोखाल पुणे जिल्ह्यातीलच सी. श्रीनाथ पी. पी. मंडळी यांच्याकडे आणि तिसर्‍या क्रमांकावर औरंगाबाद जिल्ह्यातील देवराव शिर यांच्याकडे थकबाकी आहे.
सर्वाधिक थकबाकीची रक्कम कृषी पंप धोरणांतर्गत 50 टक्के माफ केल्यानंतरची आहे. 50 टक्के सवलत मिळूनही हे कृषी पंप धारक आपली थकबाकी जमा करत नसल्याचे दुर्देवी चित्र या निमित्ताने उघड झाले आहे.
कृषी पंप थकबाकीदारांकडे असलेल्या थकबाकीचा अभ्यास राज्याच्या ऊर्जा विभागाने आणि महावितरणने सुरू केला आहे. या अभ्यासात महावितरणची राज्यातील सर्वाधिक थकबाकी असलेल्या 100 शेतकर्‍यांची यादी तयार करण्यात आली आहे. यादीचा अभ्यास केल्यानंतर 10 लाखांहून अधिक थकबाकी असलेले 20 शेतकरी वा संस्था राज्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. 20 थकबाकीदारांकडे एकूण 2 कोटी 63 लाख 82 हजार 410 रूपये थकित आहेत. ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुढाकार घेत कृषीपंप धोरण आखले असून सप्टेंबर 2020 पर्यंतच्या थकबाकीतील 50 टक्के रक्कम माफ करण्यात आली आहे. त्यानंतर सप्टेंबर 2020 पासून आजवरच्या चालू बिलाची रक्कम जोडून या धोरणांतर्गत देय थकबाकीचा आकडा महावितरणने जारी केला आहे. ही थकबाकीदार हे प्रत्येकी 10 लाख रुपयांपासून 33 लाख रुपयांपर्यंत महावितरणचे थकीत वीज बिल देणे आहे. या थकबाकीदारांमुळे महावितरणवर कर्जाचा डोंगर मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे.

साखर पट्ट्यात सर्वाधिक थकबाकीदार
राज्यातील 36 पैकी 12 जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी असलेल्या 100 व्यक्ती वा संस्था असून त्यांच्याकडे एकूण 9 कोटी28 लाख 90 हजार 600 रूपये इतकी थकबाकी जमा आहे. 100 पैकी सर्वाधिक 32 थकबाकीदार हे अहमदनगर जिल्ह्यातील, त्यानंतर 21 थकबाकीदार हे पुणे जिल्ह्यातील तर 16 थकबाकीदार हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. रोख पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या साखरेच्या पट्ट्यातील 6 जिल्ह्यात 100 पैकी सर्वाधिक 81 थकबाकीदार आहेत. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात 2, बीड जिल्ह्यात एक, नांदेड जिल्ह्यात 10 असे 100 सर्वाधिक थकबाकीदारांपैकी एकूण 13 थकबाकीदार आहेत. विदर्भात नागपूर व अमरावती जिल्ह्यात प्रत्येकी एक असे केवळ दोन थकबाकीदार या यादीत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात 4 थकबाकीदार आहेत.

10 सर्वाधिक कृषीपंप थकबाकीदार
राज्यातील सर्वाधिक 10 कृषीपंप थकबाकीदारांकडे एकूण 1,57,22,200 इतकी रक्कम थकित आहे.
राज्यातील सर्वाधिक 10 थकबाकीदारांचे नाव, पत्ता व थकबाकी पुढीलप्रमाणे : सुभकांत पंढरीनाथ काळे (सयगाव, राजगुरूनगर, पुणे) –
33,38,710 रुपये, सी. श्रीनाथ पी. पी. मंडळी (केडगाव उपविभाग, जि, पुणे) – 20,32,800, शिर देवराव गणपत (चिखलठाणा, जि. औरंगाबाद) – 15,66,580, नलिनी कांतिलाल रणदिवे (पारगाव, ता. दौंड, जि. पुणे) – 15,66,310, मेसर्स जयंत वाटर (अढेगाव टेंभूर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) – 13,48,760, श्री चैवूनय भैरवनाथ (केडगाव, जेऊर उपविभाग, ता. करमाळा, जि. सोलापूर) – 13,39,050, रखमाजी डेअरी अ‍ॅग्रो प्रॉडक्ट (मंची हिल, संगमनेर, अहमदनगर) – 12,56,860, तमदलगे सहकारी पाणी पुरवठा संस्था (दानोली, ता. शिरोळ, जि, कोल्हापूर) – 11,88,370, सौ. गुणाबाई नामदेवर पवार (इस्लामपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) – 10,50,740, संत सावता माळी पाणी पुरवठा संस्था (अकोले, टेंभूर्णी उपविभाग, ता. माढा, जि. सोलापूर) – 10,34,020 यांची आहे.

COMMENTS