Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेगावातील ८६ गावांना मिळणार शुद्ध पाणी

  बुलढाणा प्रतिनिधी - खारपाणपट्ट्यात असलेल्या योजना खामगाव, शेगाव तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये आता पिण्याचे गोड आणि शुद्ध पाणी मिळणा

विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव दिले नाही तर १६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद पाडण्याचा इशारा
मोदींनी प्रस्ताव नसताना गुजरातला मदत ; अजित पवार यांची टीका
आरटीईतून मान्यताप्राप्त शाळांनी प्रवेश देणे बंधनकारक : विनय गौडा

  बुलढाणा प्रतिनिधी – खारपाणपट्ट्यात असलेल्या योजना खामगाव, शेगाव तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये आता पिण्याचे गोड आणि शुद्ध पाणी मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कामे सुरू असून ८१ कामे प्रगतीत आहेत. तर ७ योजना विविध कारणांनी प्रलंबित आहेत. ५ योजना निविदा प्रक्रियेत असल्याची माहिती  खामगाव  विधानसभा मतदार संघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी दिली. जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी योजनांसाठी केंद्र शासनाने निधी उपलब्ध केला आहे. राज्य शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार ही कामे सुरू आहेत. दरडोई ५५ लिटरचा पुरवठा केला जाणार आहे. दोन्ही तालुक्यातील ८१ गावांमध्ये कामे सुरू आहेत. ती कामे मुदतीत आणि गुणवत्तेच्या निकषावर पूर्ण करून घेण्यासाठी प्रशासनासह ग्रामस्थांनाही लक्ष द्यावे लागणार आहे. खामगाव तालुक्यातील हिवरखेड, गणेशपूर, शिराळा येथे स्त्रोत अयोग्य, नायदेवी- पाळा येथे वनविभागाची परवानगी, नांद्री, कंझारा येथे रस्ता परवानगीसाठी रखडली. तर किन्ही महादेव जूनी योजना अंतिम टप्प्यात असल्याने वगळण्यात आली. तर पिंप्री देशमुख, कोटी, पिंप्री गवळी, जळका तेली, गेरु योजनांची निविदा प्रक्रीया सुरु आहे. तर आता ८३ गावांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. केंद्रातील मोदी सरकारने जलजीवन मिशन अंतर्गत योजनांसाठी निधी दिला. दोन्ही तालुक्यातील गावांमध्ये योजनांना मंजूरी आणि निधी मिळवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. ती कामे तातडीने सुरू केली जात असल्याचे खामगाव  विधानसभा मतदार संघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी दिली.

COMMENTS