Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बुलढाण्यातील 259 ग्रामपंचायतीचा 80.47 टक्के मतदान

मतमोजणी मंगळवारी

  बुलढाणा प्रतिनिधी - बुलढाणा जिल्ह्यात 3 लाख 3 हजार 490 नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.बुलढाणा जिल्ह्यात एकूण २७९ ग्रामपंचायत सार्वत्रिक निव

जामखेडमधील तीन ग्रामपंचायतमध्ये निवडणूक रणधुमाळी सुरू
उस्मानाबाद तालुक्यात आमदारांनी राखला गड,
राहत्यात एका सरपंचासह 25 सदस्य बिनविरोध

  बुलढाणा प्रतिनिधी – बुलढाणा जिल्ह्यात 3 लाख 3 हजार 490 नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.बुलढाणा जिल्ह्यात एकूण २७९ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर यापैकी २० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात २५९ निवडणुकीच्या सरपंच आणि सदस्य पदासाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती..सकाळी साडे 7 वाजेपासून सायंकाळी साडे 5 वाजेपर्यंत झालेल्या या मतदान प्रक्रियेत 80.47टक्के मतदान झाले. सर्व प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी, 20 डिसेंबरला होणार

आहे..जिल्ह्यातील सर्व 842 मतदान केंद्रांवर सकाळी साडे 7 वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली.सकाळी साडे 9 वाजेपर्यंत 12.61 टक्के मतदानाची टक्केवारी होती. दुपारी दीड वाजेपर्यंत 49.50 टक्के मतदान झाले. दुपारी साडे ३ वाजेपर्यंत 68.11 टक्के झाले आहे.तर सायंकाळी साडे 5 वाजेपर्यंत 80.47 टक्के मतदान झाले आहे.यामध्ये 10 तासात जिल्ह्यात एकूण 80.47 टक्के मतदान झाले आहे.यापैकी बुलढाणा जिल्ह्यात 3 लाख 3हजार 490 नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.ही माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून प्राप्त झाली आहे.

COMMENTS