Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नोकरीच्या आमीषाने 8 तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक

पुणे : नोकरीच्या आमीषाने एका संगणक अभियंत्याने आठ तरुणांची 11 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संगणक अभियंत

महसुली नोंदी असणार्‍यांना कुणबी दाखले
रेल्वे मालधक्का सुधारित मजुरी दराची महिनाभरात अंमलबजावणी
महाबळेश्‍वर येथून वेण्णा नदी संवाद यात्रेचा उत्साहात प्रारंभ

पुणे : नोकरीच्या आमीषाने एका संगणक अभियंत्याने आठ तरुणांची 11 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संगणक अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी संगणक अभियंत्याने आणखी काही तरुणांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी श्रीकांत बालाजी बिरादार (वय 30, रा. लिलियन अपार्टमेंट, वाकड) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत प्रदीप माणिक भुजबळ (वय 28, रा. लादवड, ता. खेड, जि. पुणे) याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी बिरादार संगणक अभियंता आहे. त्याने बालेवाडीतील हायस्ट्रीट परिसरात फ्रेशर जॉब हंट नावाने कंपनी स्थापन केली होती. माहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरी मिळवून देण्याचे आमिष त्याने दाखविले होते. त्याने तक्रारदार बिरादार याच्यासह आठ तरुणांकडून नोकरीच्या आमिषाने 11 लाख 30 हजार रुपये उकळले होते. प्रदीप भुजबळ याच्यासह आठ जणांना नोकरी मिळवून दिली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर भुजबळ याच्यासह आठ तरुणांनी पोलिसांकडे तक्रार दिली. बिरादारला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. बिरादाराने आणखी दहा ते पंधरा तरुणांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे तपास करत आहेत.

COMMENTS