मुंबई/प्रतिनिधी ः आठ महिन्याच्या बाळाचा औषधांच्या ओव्हर डोसमुळे मृत्यू झाल्याचा संशय असून, याप्रकरणी रुग्णालयाने बाळाचे शवविच्छेदन करण्याचा निर्ण
मुंबई/प्रतिनिधी ः आठ महिन्याच्या बाळाचा औषधांच्या ओव्हर डोसमुळे मृत्यू झाल्याचा संशय असून, याप्रकरणी रुग्णालयाने बाळाचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला, मात्र शवविच्छेन करण्यास नकार बाळाच्या वडिलांनी मृतदेह घेऊन पोबारा केल्याची घटना ठाण्यामध्ये उघडकीस आली आहे.
याप्रकरणी सविस्तर माहिती अशी की, ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका 8 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ झाला. याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून तात्काळ पोलिसांना देण्यात आली, ज्यानंतर मुलाच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरूवारी रात्री 10:30 च्या दरम्यान या 8 महिन्याच्या बाळाला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र शुक्रवारी पहाटे उपचारा दरम्यान या बाळाचा मृत्यू झाला. या बाळाला जेव्हा रुग्णालयात आणले होते, त्यावेळी न्यूमोनिया आणि खोकल्याच्या औषधाचा ओव्हर डोस दिल्याचे आढळून आले होते. बाळाचा मृत्यू झाल्यानंतर शव विच्छेदन करावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर बाळाच्या वडिलांनी त्यास विरोध केला आणि वार्डमधून आपल्या बाळाचा मृतदेह घेऊन सरळ पसार झाला. ही घटना घडल्यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ झाला. याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून तात्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शिळ डायघर येथून बापाला ताब्यात घेऊन कळवा रुग्णालयात आणले आहे. बाळाचा मृतदेहही रूग्णालयात आणण्यात आलेला आहे. बाळाला घेवून जात असताना सुरक्षा रक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा विरोध जुगारून पळून जाण्यात संबंधिताला यश आले. या घटनेची सध्या परिसरात चांगलीच चर्चा होत आहे.
COMMENTS