Homeताज्या बातम्यादेश

मदुराईजवळ रेल्वे डब्यात गॅस सिलिंडरचा स्फोट ८ ठार, २० जण जखमी

तामिळनाडू प्रतिनिधी - तामिळनाडूच्या मदुराईमध्ये लघनऊ-रामेश्वर या रेल्वे गाडीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये आठ प्रवाशांचा मृत्यू

निवडणूकपूर्व खलबते !
इतर जिल्ह्यां पेक्षा ही कडक लॉकडाऊन अहमदनगर मध्ये! जिल्हाअधिकाऱयांचा ‘हा’ आदेश | Lok News24
‘मविआ’ ची वज्रमूठ सेैल

तामिळनाडू प्रतिनिधी – तामिळनाडूच्या मदुराईमध्ये लघनऊ-रामेश्वर या रेल्वे गाडीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर २० प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ही रेल्वे लखनऊहून रामेश्वरमला जात होती. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनालूर-मदुराई एक्सप्रेसमध्ये ही भीषण आग लागली आहे. आज पहाटे ५ च्या सुमारास प्रवाशी साखर झोपेत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातलाय. त्यावेळी ट्रेन मदुराई यार्ड जंक्शनजवळ थांबली होती. काही प्रवासी अवैधपणे गॅस सिलिंडर घेऊन ट्रेनमध्ये शिरले होते, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. ट्रेनला लागलेल्या आगीचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये डब्यात भीषण आग दिसत आहे. त्याचवेळी आजूबाजूला काही लोक ओरडत आहेत. आग लागल्यानंतर मोठा आवाज देखील येत आहे. अग्निशामनक दलानं घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आहे. रेल्वेमध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन जाण्यास मनाई असताना सुध्दा काही प्रवाशांनी गॅस सिलिंडर घेऊन गेल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. मृतांमध्ये सर्व उत्तर प्रदेशचे आहेत. लखनौ-रामेश्वरम टुरिस्ट ट्रेनच्या काही प्रवाशांनी डब्यात चहा बनवायला सुरुवात केली. त्यानंतर एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे.

COMMENTS