Homeताज्या बातम्यादेश

अपघातात 8 भाविकांचा होरपळून मृत्यू

हरियाणा राज्यातील नूह जिल्ह्यात पर्यटकांच्या बसचा अपघात

नवी दिल्ली : देशभरात अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, हरियाणातील नूह येथे पर्यटकांच्या बसला आग लागल्याने तब्बल 8 भाविकांचा होरपळून मृत

भरधाव डंपर आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक
खंडाळा घाटातील अपघातात दोघांचा मृत्यू
मुंबई-गोवा मार्गावरील अपघातात 9 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशभरात अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, हरियाणातील नूह येथे पर्यटकांच्या बसला आग लागल्याने तब्बल 8 भाविकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नूह जिल्ह्यातील तवाडू उपविभागाच्या सीमेवरून जाणार्‍या कुंडली मानेसर पलवल एक्सप्रेसवेवर पर्यटकांच्या बसचा भीषण अपघात झाला. यावेळी बसमधून सुमारे 60 जण प्रवास करत होते, त्यापैकी 8 जणांचा बसला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. तर या अपघातात 24 जण गंभीर जखमी झाले आहेत. बसमध्ये प्रवास करणारे बहुतेक लोक धार्मिक यात्रेसाठी निघाले असल्याची माहिती मिळत आहे. काही प्रवासी बनारस आणि वृंदावन येथून घरी परतत होते. सर्व भाविक धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी बाहेर पडले होते आणि बनारस आणि वृंदावन येथून परतत होते. याच दरम्यान हा अपघात झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. यासोबतच स्थानिक नागरिकांनीही आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आग आटोक्यात येईपर्यंत बसमधील अनेक भाविक होरपळले होते. बसमधील प्रवासी असलेल्या सरोज पुंज आणि पूनम या पीडित भाविकांनी सांगितले की, त्यांनी गेल्या शुक्रवारी एक बस भाड्याने घेतली होती. या बसमधून सर्व भाविक बनारस आणि मथुरा वृंदावनला भेट देण्यासाठी गेले होते. बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह 60 जण होते. हे सर्वजण जवळचे नातेवाईक होते, जे पंजाबमधील लुधियाना, होशियारपूर आणि चंदीगड येथील रहिवासी होते. शुक्रवार-शनिवारी रात्री दर्शन घेऊन ते परतत होते. रात्री उशिरा दीड वाजण्याच्या सुमारास बसने अचानक पेट घेतला. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीनं त्या बसमधून बाहेर आल्या. मात्र तोपर्यंत 8 भाविकांचा होरपळून मृत्यू झाला होता.

COMMENTS