Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळा अंतर्गत मतदारसंघात बंधाऱ्याचे कामास ८ कोटी ३२ लक्ष मंजूर – आ. मोनिका राजळे यांची माहिती

पाथर्डी प्रतिनिधी - शेवगांव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात जलसंधारण महामंडळाकडून १५ बंधाऱ्यांसाठी रु. ८ कोटी ३२ लक्ष मंजूर झाले आहेत. यामध्ये ६

जामखेडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे
पारनेरला वराळ पतसंस्थेच्या ठेवीदारांचे उपोषण
तब्बल 22 वर्षांपासून फरार गुन्हेगार अखेर जेरबंद

पाथर्डी प्रतिनिधी – शेवगांव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात जलसंधारण महामंडळाकडून १५ बंधाऱ्यांसाठी रु. ८ कोटी ३२ लक्ष मंजूर झाले आहेत. यामध्ये ६ को.प.बंधारे व ९ द्वारयुक्त सिमेंट बंधाऱ्याचा समावेश आहे. जलसंधारण महामंडळाकडून सदर बंधारे मंजूरीसाठी राज्याचे जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांचेकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे ही कामे मंजूर झाली आहेत.

मागील दीड वर्षात अनेक गांवात साठवण बंधाऱ्याचे कामे झालेली आहेत.त्यामुळे अनेक गांवातील शेतीच्या व पिण्याचे पाण्याचा प्रश्न मार्गी लागत आहे. या मंजूर कामामध्ये बालमटाकळी ३६.३८ लक्ष, अधोडी ४६.८८ लक्ष,ठाकूर पिंपळगांव ७२.२५ लक्ष, शिंगोरी (गुट्टे वस्ती) ५०.८८ लक्ष, भापकरवाडी ३६.०३ लक्ष, आल्हणवाडी क्र.1(महालदरा) ६२.७० लक्ष, आल्हणवाडी क्र.२ (खांडगे वस्ती) ५६.८२ लक्ष, जाटदेवळा (अडळवाडी) ४६.९९ लक्ष, आल्हणवाडी क्र.३ (फुंदेवस्ती) ४०.२५ लक्ष, मानेवाडी नं.१ ४७.०२ लक्ष, मालेवाडी नं.१ ६३.५२ लक्ष, मालेवाडी नं.2 ६३.४१ लक्ष, पिंपळगांव टप्पा (मंदिराजवळ) १०.६१ लक्ष, नागलवाडी (झोटींग मळा) ४८.८९ लक्ष, खामपिंप्री १ (पुलाजवळ) ५४.०९ लक्ष या कामांना मंजूरी मिळालेली आहे. ही कामे मंजूर केल्यामुळे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंधारण मंत्री संजय राठोड, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. खासदार डॉ. सुजय विखे पा. यांचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी आभार मानले.

COMMENTS