Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात 75 नाट्यगृहेे उभारणार ः मंत्री मुनगंटीवार

शंभराव्या नाट्य संमेलनाची सांगलीत मुहुर्तमेढ

सांगली : भावनांचा निचरा करण्यासाठी माणसांनी कला म्हणून नाटकाकडे पाहिले पाहिजे. नाटकाला रसिकांचा आश्रय मिळावा यासाठी 75 नवीन नाट्यगृहे उभारण्याचा

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची आदित्य ठाकरेंवर टीका
गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी 15 सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदवावा
मग आता संजय राऊत ज्योतिषी झाले काय ?

सांगली : भावनांचा निचरा करण्यासाठी माणसांनी कला म्हणून नाटकाकडे पाहिले पाहिजे. नाटकाला रसिकांचा आश्रय मिळावा यासाठी 75 नवीन नाट्यगृहे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही सर्व नाट्यगृहे वातानुकूलित असतील आणि यासाठी सौरउर्जेचा वापर केला जाईल. यामुळे नाट्यगृहाची भाडे आकारणी मर्यादित होऊन रसिकांनाही कमी दरात चांगली नाटके पाहता येतील असा आशावाद राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. सांगलीत शंभराव्या नाट्य संमेलनाचा मुहुर्तमेढ सोहळा शुक्रवारी संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, खा. संजयकाका पाटील, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, 99 व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, 100 व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले उपस्थित होते.
यावेळी बोलताना सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार म्हणाले, नाटक हा उत्कृष्ट कलाप्रकार असून देशात बंगाल आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतच हा कलाप्रकार अधिक चांगल्या पद्धतीने विकसित झाला आहे. नाट्य संमेलनाच्या निमित्ताने हा कला प्रकार अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचावा यासाठी चिंतन, मनन होण्याची गरज आहे. इलेक्ट्रॉनिक युगात नाट्य कला वृद्धींगत होण्यासाठी रसिक, कलावंत आणि नाटककार या तीन गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष देण्याची आवश्यकता असून यासाठी शासन मदत करण्यास सदैव तयार आहे. ज्यावेळी भाषाही विकसित झालेली नव्हती, तेव्हापासून अभिनयाद्वारे संवाद साधण्याची कला माणसाने आत्मसात केली आहे. यामुळे अभिनय क्षेत्राला मानवी विकासात महत्वाचे स्थान आहे. यावेळी लोकसाहित्याच्या अभ्यासिका डॉ. तारा भवाळकर, भाषाशास्त्राचे अभ्यासक सदानंद कदम, शाहीर देवानंद माळी यांचा सत्कार करण्यात आला. राजेंद्र पोळ यांच्या नाट्य संहिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. दरम्यान, सकाळी गिरीष चितळे आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते मुहुर्तमेढीचे पूजन करण्यात आले. यानंतर हरिपूर येथे देवल कट्टा, मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृह, अण्णाभाऊ साठे यांचा कर्मवीर चौकातील पुतळा, दीनानाथ नाट्यगृह, विष्णुदास भावे यांच्या आठवणी सांगणारा गणपती मंदिर परिसर आणि सांगलीवाडी येथील नाट्याचार्य खाडिलकर यांचे दत्त मंदिर येथे नाट्य संहितेचे पूजन करण्यात आले.

COMMENTS