पोखरा/वृत्तसंस्था ः नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्यापूर्वी रविवारी 72 आसनी प्रवासी विमान कोसळले. या विमान अपघातात सर्व 72 जणांचा
पोखरा/वृत्तसंस्था ः नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्यापूर्वी रविवारी 72 आसनी प्रवासी विमान कोसळले. या विमान अपघातात सर्व 72 जणांचा मृत्यू झाला असून अपघातानंतर विमानतळ बंद करण्यात आले असून बचावकार्य सुरु आहे. या विमानात 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्ससह एकूण 72 जण होते. या विमानात 11 परदेशी पर्यटकांसह तीन नवजात मुले होती. अपघाताच्या वेळी विमानात 53 नेपाळी, पाच भारतीय, चार रशियन, एक आयरिश नागरिक, दोन कोरियन, एक अर्जेंटिनाचा आणि एक फ्रेंच नागरिक होता, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी दिली.
खराब हवामानामुळे विमातळाजवळ असलेल्या डोंगराला धडकून या विमानाचा अपघात झाला. या धडकेनंतर विमान विमानतळाजवळील नदीच्या किनारी आदळले. त्याचवेळी पोखरा विमानतळावर प्रवासी विमान अपघातानंतर नेपाळ सरकारने मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावली आहे.खराब हवामानामुळे विमान डोंगराला धडकून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान नेपाळ लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 44 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.या विमानाने रविवारी सकाळी साडेदहा वाजता त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले होते. काठमांडू पोस्टने यति एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांच्या माध्यमातून वृत्त दिले की, अपघात झालेल्या यति एअरलाइन्सच्या विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान हे विमान कोसळले. नेपाळमधील पोखरा विमानतळावर झालेल्या विमान अपघातात काठमांडू, नेपाळमधील भारतीय दूतावासाने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. विमानात 5 भारतीयांसह 68 प्रवासी होते. गेल्या वर्षी मे महिन्यात मुस्तांगच्या थासांग येथील सनो स्वारे भीर येथील डोंगरावर तारा एअरचे विमान कोसळून 22 जणांचा मृत्यू झाला होता. या विमानात तीन क्रू आणि चार भारतीय आणि दोन जर्मन नागरिकांसह 16 नेपाळी होते.
नेपाळचे आकाश ठरतेय विमानांसाठी मृत्यूचा सापळा – नेपाळमधील पोखरा एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून, याठिकाणी भेट देण्यासाठी प्रवासी मोठया प्रमाणांवर गर्दी करतांना दिसून येतात. मात्र नेपाळचे आकाश विमानांसाठी मृत्यूचा सापळा ठरतांना दिसून येत आहे. दोन महिन्यापूर्वी, थायलंड एअरवेजचे एक विमान याच विमानतळाजवळ दुर्घटनाग्रस्त झाले होते. त्यामध्ये 113 लोकांचा मृत्यू झाला होता. याआधीही नेपाळमध्ये अनेक विमान अपघात झाले आहेत.नेपाळ एअरलाइन्स तारा एअरद्वारे संचालित एक विमान मे 2022 मध्ये अपघातग्रस्त झाले होते, ज्यात 22 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. एप्रिल2019मध्ये सुलोखुंबु जिल्ह्यातील लुकला एअरपोर्टवर एक विमान क्रॅश झाले होते. यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला होता.
COMMENTS