Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंढरपूरला जाताना कारच्या धडकेत कोल्हापूर जिल्ह्यातील 7 वारकर्‍यांचा मृत्यू

तासगाव / प्रतिनिधी : रत्नागिरी-नागपूर महामार्गावर कोल्हापूरच्या वारकर्‍यांच्या दिंडीला भीषण अपघात झाल्याची घटना घडली. जुनोनी (ता. सांगोला) गावा

कोल्हापूरच्या माजी महापौरांचे थेट महापालिकेच्या दारातच अभ्यंगस्नान
विशाळगडावरील घटना दुर्दैवी : आ. जयंत पाटील
औदुंबर-भुवनेश्‍वरीदरम्यान होणार झुलता पूल; झुलत्या पुलामुळे पर्यटनाला चालना

तासगाव / प्रतिनिधी : रत्नागिरी-नागपूर महामार्गावर कोल्हापूरच्या वारकर्‍यांच्या दिंडीला भीषण अपघात झाल्याची घटना घडली. जुनोनी (ता. सांगोला) गावाजवळ पंढरपूरला जाणार्‍या या दिंडीमध्ये भरधाव वेगाने कार घुसल्याने सात वारकर्‍यांचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात मृत झालेल्या सात पैकी पाच वारकरी हे जठारवाडी (जि. कोल्हापूर) या गावातील असल्याची माहिती मिळत आहेत.
कोल्हापूर जठारवाडी येथील दिंडी पंढरपूरकडे जात होती. सोमवारी सायंकाळी ही दिंडी सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाच्या हद्दीत आली. दरम्यान जुनोनी येथे चारचाकी ही दिंडीत घुसल्याने ही दुर्घटना घडली. यामध्ये 7 वारकर्‍यांचा यांचा मृत्यू झाला आहे. 6 जणांना उपचारासाठी पंढरपूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सांगोला पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ठार झालेल्या व्यक्िंतमध्ये पाच महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.
दुर्घटनेत जखमी व मृत वारकर्‍यांची नावे
अपघात स्थळी सांगोला पोलीस निरीक्षकांसह त्यांचे पथक दाखल झाले आहे. सर्वं मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पुढे हलविण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीपैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांपैकी शांताबाई शिवाजी जाधव (वय 70) या महिला वारकरी यांचे नाव आहे. अद्याप सहा मयताची ओळख पटली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच या अपघातात जखमी झालेल्या वारकर्‍यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. अनिता गोपीनाथ जगदाळे (वय 60), अनिता सरदार जाधव (वय 55), सरिता अरुण सेयेकर (वय 45), शानुबाई विलास सेयेकर (वय 35), सुभाष केशव काटे (वय 67) अशी जखमींची नावे आहेत.

COMMENTS