Homeताज्या बातम्यादेश

एका महिन्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांत 7 पटीने वाढ

दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि केरळमध्ये कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः देशातमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून, एका महिन्यात सक्रिय रुग्णांच्या संख्या 7 पटीन

तरुणींमध्ये कॉलेजच्या आवारातच हाणमारी सुरू   
विषबाधा करून जीवे मारण्याचा प्रयत्न
कार्यालय ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस चे आज ठिय्या आंदोलन

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः देशातमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून, एका महिन्यात सक्रिय रुग्णांच्या संख्या 7 पटीने वाढल्याचे दिसून येत आहे. 3 मार्च रोजी अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 2686 होती, ती वाढून 20,219 झाली आहे. हा आकडा ऑक्टोबरनंतरचा सर्वाधिक आहे. यापूर्वी 23 ऑक्टोबर रोजी सक्रिय रुग्णांची संख्या 20,601 होती. त्याच वेळी, गेल्या 24 तासात कोरोनाचे 3,641 नवीन रुग्ण आढळले आहेत. तसेच 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, गुजरात आणि हिमाचल प्रदेशातून सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या समोर येत आहे. या राज्यांमध्ये एक हजाराहून अधिक अ‍ॅक्टिव्ह प्रकरणे समोर आली आहेत. दुसरीकडे, सोमवारी छत्तीसगडमधील मुलींच्या वसतिगृहात 19 विद्यार्थिनींना संसर्ग झाल्याचे आढळून आले. सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या विद्यार्थिनींच्या संपर्कात आलेल्या इतर विद्यार्थ्यांचीही चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.  महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कोरोनाचा सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे. या दोन्ही राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजारांहून अधिक आहे. सोमवारी महाराष्ट्रात 248 नवीन रुग्ण आढळले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्याचवेळी, गुजरातमध्ये 231 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले, 349 रुग्ण बरे झाले. सुदैवाने येथे कोणाचाही मृत्यू झालेला नाही. केरळबद्दल बोलायचे तर येथे सर्वाधिक 4,740 सक्रिय प्रकरणे नोंदवली गेली आहेत. कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून राज्यात 71 हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाचा वेग वाढला आहे. सोमवारी येथे 293 नवीन रुग्णांची नोंद झाली. दोन जणांचा मृत्यूही झाला. 2 एप्रिल रोजी राजधानीत 429 नवीन रुग्णांची नोंद झाली. दिल्लीत पॉझिटिव्ह रेट 18% पेक्षा जास्त आहे. म्हणजेच, चाचणी दरम्यान 100 पैकी 18 लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. कोरोनाचा धोका पाहता सरकार सतर्क असल्याचे दिल्ली सरकारचे म्हणणे आहे. कोरोनाला तोंड देण्यासाठी तयारीचा आढावा घेतला जात आहे.

COMMENTS