Homeताज्या बातम्यादेश

कोचिंग अपघातप्रकरणी मालकासह 7 जणांना अटक

नवी दिल्ली ः राजधानी दिल्लीतील जुन्या राजेंद्रनगर येथे तळघरात पाणी साचल्याने तीन विद्यार्थ्यांना बुडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी राऊ

शिष्यवृत्ती परीक्षा ही एमपीएससी परीक्षेची पूर्वतयारी :- अभय आव्हाड 
विवाहितेचा छळ करणार्‍या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
पश्‍चिम महाराष्ट्रात वीजग्राहकांकडे सुरक्षा ठेवीच्या रकमेची थकबाकी 2352 कोटींवर

नवी दिल्ली ः राजधानी दिल्लीतील जुन्या राजेंद्रनगर येथे तळघरात पाणी साचल्याने तीन विद्यार्थ्यांना बुडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी राऊ कोचिंग क्लासेसचे मालक आणि समन्वयकाला अटक केली होती. पोलिसांनी सोमवारी सांगितले की, याप्रकरणी आणखी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कोचिंग क्लाससमोर वेगाने कार चालवणार्‍या व्यक्तीचा समावेश आहे. गाडी वेगाने चालवल्यामुळे पाण्याचा दाब वाढून तळघराचे गेट तुटल्याचे दिसते. यानंतर तळघरात बांधलेल्या लायब्ररीत पाणी भरले आणि विद्यार्थी बुडू लागले.
दुसरीकडे जुन्या राजेंद्र नगरातील नाल्याच्या आजूबाजूचे अतिक्रमण बुलडोझरच्या साहाय्याने हटविण्यात आले. त्याच वेळी एमसीडीने एका कनिष्ठ अभियंत्याला आणि सहायक अभियंत्याला निलंबित केले आहे. याशिवाय कोचिंगचे विद्यार्थी सलग दुसर्‍या दिवशी एमसीडी आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करत आहेत. पोलिसांनी सोमवारी सकाळी जुने राजेंद्र नगर येथील अतिक्रमण हटवले. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 27 जुलैच्या रात्री इमारतीतील वीज खंडित झाल्याने तळघरातील वाचनालयाचे बायोमेट्रिक गेट जाम झाले. विद्यार्थी लायब्ररीत अंधारात अडकले. सुरुवातीला गेट बंद असल्याने तळघरात पाणी शिरले नाही, मात्र काही मिनिटांनी पाण्याचा दाब वाढून गेट तुटले. गेट तुटल्यानंतर तळघरात वेगाने पाणी भरू लागले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. प्रवाह इतका जोराचा होता की पायर्‍या चढणे कठीण झाले होते. काही सेकंदातच गुडघाभर पाणी होते. अशा स्थितीत विद्यार्थी बाकावर उभे राहिले. अवघ्या 2-3 मिनिटांत संपूर्ण तळघर 10-12 फूट पाण्याने भरले. विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी दोरी फेकण्यात आली, मात्र पाणी घाण असल्याने दोरी दिसत नव्हती. बाकही पाण्यात तरंगत होते. त्यामुळे बचावकार्यात अडचणी येत होत्या. रात्री उशिरा 3 विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले. दोरीच्या साहाय्याने 14 मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली. बचावकार्य अंतिम टप्प्यात असताना आतमध्ये 7 फूट पाणी होते.

उच्च न्यायालयातही याचिका दाखल – कोचिंग अपघाताबाबत राष्ट्रीय प्रवासी मंचच्या याचिकेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करून अपघात झाल्यास योग्य ती भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने जनहित याचिकामध्ये दिल्ली सरकार, एमसीडी आणि राऊ आयएएस कोचिंग यांना पक्षकार बनवले आहे. यामध्ये उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली या घटनेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

COMMENTS