छ. संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगरमधील छावणी परिसरात बुधवारी पहाटे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत दोन पुर

छ. संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगरमधील छावणी परिसरात बुधवारी पहाटे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत दोन पुरुष, तीन महिला आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातले सात जण या घटनेत मृत्यूमुखी पडले आहेत. छावणी परिसरातील दाना बाजार गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या बाजूला असलेल्या किंग टेलर्सच्या दुकानाला लागलेल्या आगीतून ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे.
आगीमुळे धुराचे प्रचंड लोट छावणी परिसरात निर्माण झाले होते. जैन मंदिराच्या शेजारी असणार्या दुमजली घरात ही आग लागली. या घरातील पहिल्या मजल्यावर पहाटे गाढ झोपेत असणार्या लोकांना खाली उतरण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे गुदमरून सात जणांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये हमीदा बेगम-50 वर्षे, शेख सोहेल-35 वर्षे, वसीम शेख-30 वर्षे, तन्वीर वसीम-23 वर्षे, रेश्मा शेख-22 वर्षे, आसिम वसीम शेख-3 वर्ष, परी वसीम शेख-2 वर्षे यांचा समावेश आहे. आगीचे वृत्त समजताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाने आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे. या इमारतीला पहाटे 4 च्या सुमारास अचानक आग लागली. कपड्याचे दुकान असल्याने आग काही वेळातच पसरली. यात दुकानात वरच्या मळ्यात झोपलेले एकाच कुटुंबातील सात जण होरपळून ठार झाले. मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांकडून पंचनामा केला जात आहे. या आग लागलेल्या इमारतीत एकूण 16 लोक होते. पहिल्या मजल्यावर 7 लोक होते. तर दुसर्या मजल्यावर 7 लोक होते आणि तिसर्या मजल्यावर 2 लोक होते. यामध्ये दुसर्या मजल्यावरील सर्व सात लोकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका चार्जिंगच्या दुचाकीमध्ये जोराचा स्फोट झाला. यावेळी या दुचाकीला चार्जिंगसाठी चार्जर लावण्यात आलेले होते. त्यामुळे वायरच्या माध्यमातून आग थेट दुकानात लावलेल्या चार्जिंग सॉकेटपर्यंत पोहचली आणि दुकानात देखील आग लागली. कपड्याचे दुकान असल्याने काही वेळातच आग संपूर्ण दुकान आणि त्यानंतर इमारतमध्ये पसरली. विशेष म्हणजे दुसर्या मजल्यावर आतमध्ये येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एकच एन्ट्री आणि एक्झिट पॉईंट असल्याने खालच्या लोकांना वरती जाता आले नाही. त्यामुळे दुसर्या मजल्यावरील लोकांना वाचवण्यात अपयश आले. याबाबत माहिती देताना औरंगाबादचे पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी सांगितले की, पहाटे चारला छत्रपती संभाजीनगरातील छावणी रिसरात एका कपड्याच्या दुकानाला आग लागली. प्राथमिक तपासानंतर या दुर्घटनेत सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मात्र, या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या पुढील तपास सुरू आहे.
COMMENTS