Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू

फटाक्याच्या गोदामाला मोठी आग लागून दुर्घटना

पुणे : जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात एका फटाक्याच्या गोदामाला मोठी आग लागली असून यात होरपळून सात जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आगीत अनेक

 अनैतिक संबंधातून माय लेकीवर वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न       
ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची प्रकृती खालावली
अजितदादांनी ‘बार्टी’च्या कारभाराची झाडाझडती घेण्याची गरज

पुणे : जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात एका फटाक्याच्या गोदामाला मोठी आग लागली असून यात होरपळून सात जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आगीत अनेक जण अडकल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवडच्या तळवडे एमआयडीसीत हा प्रकार घडला आहे. वाढदिवसाच्या केकवर लावण्यात येणार्‍या मेणबत्त्या व फटाक्याच्या गोदामात ही आग भडकली. गोदामात सगळ्या वस्तू ज्वलनशील असल्यामुळे काही क्षणातच आगीने संपूर्ण गोदाम व्यापले आहे. आगीची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचे पथक, पाच गाड्यांसह घटनास्थळी पोहोचले आहे. आग आटोक्यात आणण्याबरोबरच लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी सात ते आठ रुग्णवाहिका दाखल झाल्या असून सात मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. गोदामात आणखीही कामगार अडकले असून त्यात काही महिलाही असल्याचे समजते.

COMMENTS