मुंबई ः शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक खासदारांची उमेदवारी डावलण्यात आली आहे. भावना गवळी, हेमंत पाटील, कृपाल तुमाने यांची उमेदवारी डावलल्यानंतर शि
मुंबई ः शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक खासदारांची उमेदवारी डावलण्यात आली आहे. भावना गवळी, हेमंत पाटील, कृपाल तुमाने यांची उमेदवारी डावलल्यानंतर शिंदे गटातील अनेक खासदार नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला असतांनाच, शिंदे गटातील 7 खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा दावा विधान सभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. शिंदे गटाचे निम्मे खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत, असे ते म्हणाले.
महायुतीमध्ये जागावाटप अजूनही पूर्ण झालेले नाही. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 13 खासदारांनी ठाकरे यांची साथ सोडत शिंदे यांच्यासोबत जाणे पसंद केले होते. मात्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे अनेकांचे मंत्रिपदाचे स्वप्न भंगले असतांनाच अनेकांचे पुन्हा खासदार होण्याचे स्वप्न देखील भंगतांना दिसून येत आहे. त्यामुळे हे नाराज खासदार स्वगृही म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत परतण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. त्यात विजय वडेट्टीवार यांनी उपरोक्त दावा केल्यामुळे या चर्चेला चांगलीच हवा मिळाली आहे. शिंदेंच्या 7 खासदारांची काय गत झाली? उद्धव ठाकरे भेटत नसल्याची ओरड करणार्यांना आता जागाही भेटत नाही. त्यांचे निम्मे खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी भाजपचे पुन्हा सत्ता मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळवण्याचाही संकल्प व्यक्त केला. सद्यस्थितीत शिवसेनेचा शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट गोंधळलेल्या स्थितीत आहे. भाजपचीही मोठी दमछाक सुरू आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची इंडिया आघाडी भाजपचे पुन्हा सत्ता मिळवण्याचे स्वप्न निश्चितच धुळीस मिळवेल, असे ते म्हणाले.
विदर्भात काँगे्रसला पोषक वातावरण – विदर्भात काँगे्रससाठी चांगली परिस्थिती असून, पहिल्या टप्प्यातील पाचही जागांवर जनता काँग्रेसला आपला कौल देईल. विद्यमान सरकार विरोधात जनतेत प्रचंड राग व चीड आहे. सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळे स्वतंत्र भारताचे उद्या आपण गुलाम होऊ अशी भीती लोकांना वाटत आहे. परिणामी, लोकांनीच आता भाजपला सत्तेतून बेदखल करण्याचा निश्चय केला आहे. गडचिरोली लोकसभा मतदार संघ काँग्रेस जिंकेल. या ठिकाणी भाजपला दुसरा पर्याय मिळाला नसल्यामुळे काँग्रेसचे किरसान सहज निवडून येतील, असा विश्वासही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केला. विजय वडेट्टीवार यांनी सांगलीचा मुद्दा फार वाढवण्याची गरज नसल्याचेही यावेळी स्पष्ट केले.
COMMENTS