Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईच्या डॉक्टरांची 7 लाखांची फसवणूक

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानींच्या नावाने एक व्हिडीओ मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये मुकेश अंबानी हे शेअर ट्

भारतराष्ट्रसमिती पक्षातर्फे देवळालीत मोर्चेबांधणी 
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दरवर्षीप्रमाणे सोयगाव तालुक्यातील बंजारा समाज बांधवांसोबत केली होळी-रंगपंचमी 
कोलकाता संघात अचानक मोठा बदल

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानींच्या नावाने एक व्हिडीओ मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये मुकेश अंबानी हे शेअर ट्रेडिंगसंबंधित बोलताना गुंतवणुकीचा सल्ला देताना दिसतात. पण नंतर हा व्हिडीओ डीप फेक असल्याचे समोर आले. पण हा व्हिडीओ पाहून मुंबईतील एका डॉक्टरने गुंतवणूक केली आणि त्याची 7 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. डॉ. के.एच. पाटील असे पीडित डॉक्टर असून ते पश्‍चिम मुंबईतील अंधेरी येथील रहिवासी आहेत. डॉ. के.एच. पाटील हे आयुर्वेद अभ्यासक आहेत आणि मे महिन्यात त्यांच्या इंस्टाग्राम फीडमधून स्क्रोल करत असताना त्यांना एक डीपफेक व्हिडिओ समोर आला. त्या व्हिडीओमध्ये मुकेश अंबानी हे राजीव शर्मा ट्रेड ग्रुप नावाच्या ट्रेडिंग अकादमीची जाहिरात करताना दिसत होते. शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली व्हायरल होणार्‍या व्हिडीओला मुंबईतील 54 वर्षीय आयुर्वेदिक डॉक्टर फसवणुकीचा बळी ठरला. अंधेरीच्या रहिवासी डॉक्टरने इंस्टाग्रामवर एक रील पाहिली होती. या रीलमध्ये मुकेश अंबानी एका कंपनीचे प्रमोशन करत होते. ही रील बनावट असून सायबर चोरांनी डॉक्टरची 7 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केली होती. डॉ. के.एच. पाटील असे पीडित डॉक्टर असून ते पश्‍चिम मुंबईतील अंधेरी येथील रहिवासी आहेत. डॉ. पाटील, 54, हे आयुर्वेद अभ्यासक आहेत आणि मे महिन्यात त्यांच्या इंस्टाग्राम फीडमधून स्क्रोल करत असताना, त्यांना एक डीपफेक व्हिडीओ समोर आला ज्यामध्ये मुकेश अंबानी राजीव शर्मा ट्रेड ग्रुप नावाच्या ट्रेडिंग अकादमीची जाहिरात करताना दिसत होते. या डीपफेक व्हिडीओमध्ये, अंबानी ट्रेडिंग अकादमीच्या यशाबद्दल बोलत आहेत आणि लोकांना त्यांच्याद्वारे केलेल्या गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवण्यासाठी बीसीएफ अकादमी नावाच्या अकादमीमध्ये सामील होण्यास सांगत आहेत. डॉ.पाटील यांनी 15 एप्रिल रोजी पहिला व्हिडीओ पाहिला. एफआयआरमध्ये म्हटले आहे की डॉ. पाटील यांनी डीपफेक व्हिडीओ पाहिल्यानंतर सुरुवातीला इंटरनेटवर ग्रुप शोधला. यावेळी त्यांची कार्यालये लंडन आणि मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असल्याची माहिती मिळाली. यामुळे त्याचा त्यांच्यावर विश्‍वास बसला आणि अशा प्रकारे त्याने ऑनलाइन संपर्क साधला आणि मे ते जून दरम्यान सुमारे 7.1 लाख रुपये गुंतवले.

COMMENTS