Homeताज्या बातम्यादेश

बिहारमधील मंदिरात चेंगराचेंगरी 7भाविकांचा मृत्यू, 35 जण जखमी

पाटणा ः बिहारमधील एका मंदिरात रविवारी रात्री चेंगराचेंगरी झाली असून, यात 7 भाविकांचा मृत्यू झाला असून तब्बल 35 भाविक जखमी असल्याचे समोर आले आहे.

भरदिवसा चोरट्याने दुचाकी नेली पळवून; घटना CCTV मध्ये कैद .
टीईटी पेपरफुटीचे संगमनेर कनेक्शन चर्चेत
LokNews24 l महंत लक्ष्मण महाराज रामगडकर यांच्या निधनाने वारकरी संप्रदाय पोरका

पाटणा ः बिहारमधील एका मंदिरात रविवारी रात्री चेंगराचेंगरी झाली असून, यात 7 भाविकांचा मृत्यू झाला असून तब्बल 35 भाविक जखमी असल्याचे समोर आले आहे. बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यातील बाबा सिद्धेश्‍वर मंदिरातील ही घटना आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देतांना जिल्हाधिकारी अलंकृता पांडे म्हणाल्या की, प्रथमदर्शनी असे दिसते की कावडियांमध्ये कशावरून तरी वाद झाला होता. त्यानंतर त्यांच्यात बाचाबाची आणि हाणामारी झाली. पांडे यांनी सांगितले की, ही घटना रविवारी रात्री उशिरा रात्री 11.30 च्या सुमारास घडली. जहानाबाद पोलिसांनी 7 जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. तर 35 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींवर स्थानिक मखदुमपूर आणि इतर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रशासनाच्या अनास्थेमुळे हा प्रकार घडल्याचा आरोप नागरिक करत आहेत. प्रशासनाने सुरक्षेसाठी नॅशनल कॅडेट कॉर्प्सचे लोक तैनात केले होते आणि त्यांनी भाविकांवर लाठ्यांचा वापर केला. त्यामुळे लोकांची धावपळ सुरू झाली आणि काही लोक पडले. हा सर्वस्वी प्रशासनाचा दोष आहे, असा आरोपी नागरिकांचा आहे.

COMMENTS