Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डीसाठी 650 ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

शिर्डी प्रतिनिधी ः लोकसभा निवडणुकीत 85 वयापेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक व 40 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असलेली व्यक्ती मतदानापासून वंचित

म.गांधी व लालबहाद्दूर शास्ञी यांचे जीवन कार्य प्रेरणादायी; माजी आ.मुरकुटे
कोतुळ दूध आंदोलनाची 33 व्या दिवशी सांगता
संगमनेरात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा

शिर्डी प्रतिनिधी ः लोकसभा निवडणुकीत 85 वयापेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक व 40 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असलेली व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने होम वोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली. 7 मे ते 9 मे दरम्यान राबविण्यात आलेल्या गृह मतदानात शिर्डी लोकसभा मतदारसंघात 650 मतदारांनी मतदान केले.
18 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान शिर्डी लोकसभेत होम वोटिंगसाठी 700 मतदारांनी बीएलओकडे अर्ज केले होते. पहिल्या दिवशी 307 ज्येष्ठ नागरिक व 57 दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.  दुसर्‍या दिवशी 243 ज्येष्ठ नागरिक व 39 दिव्यांग मतदारांनी मतदानांचा हक्क बजावला. आजच्या तिसर्‍या दिवशी 4 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान न झालेल्या 50 मतदारांपैकी 18 मतदार मयत आहेत. 22 मतदार घरी आढळून आले नाहीत. यातील बहुतेक मतदार रूग्णालयात दाखल आहेत. 10 मतदारांनी मतदान करण्यास नकार दिला. विधानसभा मतदारसंघ अकोले-132, संगमनेर-102, शिर्डी-113, कोपरगाव-111, श्रीरामपूर-96 व नेवासा -96 असा 650 मतदारांनी होम वोटींगद्वारे मतदानाचा हक्क बजावला. होम वोटिंगसाठी मतदारांच्या घरी प्रत्यक्ष बूथ उभारण्यात आला होता. यासाठी पोलीस, दोन निवडणूक अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक व कॅमेरामन अशी टीमची नियुक्ती करण्यात आली होती. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली आहे.

COMMENTS