Homeताज्या बातम्यादेश

व्यापार्‍याच्या घरी आढळले 60 कोटी

प्राप्तीकर विभागाच्या छाप्यात सापडले घबाड

आग्रा ः आग्रा येथील बूट व्यापार्‍यांच्या घरावर प्राप्तीकर विभागाने छापे टाकले. यातील एका व्यावसायिकाच्या घरातून प्राप्तीकर विभागाना तब्बल 60 कोटी

धक्कादायक! पबजी खेळण्यात गुंतला अन् थेट इमारतीवरून खाली पडला | LOKNews24
हनुमानाच्या जन्मस्थळांचा वाद जुनाच ; पाच ठिकाणी जन्म झाल्याच्या पुराणकथा
सद्गगुरू शुक्राचार्य महाराज जन्मोत्सव व शिव-पार्वती विवाह सोहळा उत्साहात

आग्रा ः आग्रा येथील बूट व्यापार्‍यांच्या घरावर प्राप्तीकर विभागाने छापे टाकले. यातील एका व्यावसायिकाच्या घरातून प्राप्तीकर विभागाना तब्बल 60 कोटी रूपयांचे घबाड सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या नोटा बेड, गाद्या आणि कपाटात लपवून ठेवल्या होत्या. त्याचे चित्रही समोर आले. पलंगावर चलनी नोटांचे बंडल ठेवलेले दिसून येत आहे. जमिनीवर ठेवलेल्या पिशव्याही नोटांनी भरलेल्या आहेत.
हरमिलाप ट्रेडर्सचे मालक रामनाथ डांग यांच्या घरावर 30 तासांपासून छापा टाकण्यात येत आहे. झडती घेतली असता त्यांच्या घरातील बेड आणि गाद्यामध्ये नोटांची बंडले सापडली. मोठ्या प्रमाणात रोकड पाहून अधिकार्‍यांनी नोटा मोजण्यासाठी बँकेतून 10 मशीन मागवल्याअजूनही नोटांची मोजणी सुरू असल्याचे आयकर विभागाने सांगितले. करचुकवेगिरीबद्दल माहिती मिळाल्यानंतर, आयकर पथकांनी शनिवारी आग्रा येथील तीन व्यावसायिकांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले. या पथकांनी एकाच वेळी एमजी रोडच्या बीके शूजच्या मालकाच्या कार्यालयावर आणि घरावर छापे टाकले, धाकरणच्या मनशु फूटवेअर आणि हेंग की मंडीच्या हरमिलाप ट्रेडर्सवर छापे टाकले.

COMMENTS