Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वैनगंगा नदीत 6 महिल्या बुडाल्या

एकीचा मृतदेह आढळला 5 अजूनही बेपत्ता

गडचिरोली ः जिल्ह्यातील चार्मोशी तालुक्यात कामासाठी जात असलेल्या सहा महिल्या वैनगंगा नदीतून नावेतून जात असतांना या महिल्या बुडाल्या. ही घटना मंगळव

 सुकेवाडी येथे अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा; नवरदेव नवरीला बैलगाडीतून गावची सफर
संविधान महासभा आणि राहुल गांधी!
बेस्ट बिफोर नियमाचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करावी

गडचिरोली ः जिल्ह्यातील चार्मोशी तालुक्यात कामासाठी जात असलेल्या सहा महिल्या वैनगंगा नदीतून नावेतून जात असतांना या महिल्या बुडाल्या. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. या महिलांचा शोध घेतला असून, यातील एका महिलेचा मृतदेह हाती आला असून, इतर महिला बेपत्ता असून, त्यांची शोधमोहीम सुरू आहे.
चार्मोशी तालुक्यातील गणपूर लगत वाहणार्‍या वैनगंगा नदीत मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली. महिला एका नावेतून वैनगंगेच्या दुसर्‍या तिरावर असणार्‍या एका गावात मिरची तोडणीसाठी जात होत्या. नदीच्या मध्यभागी आल्यानंतर अचानक त्यांची नाव उलटली. त्यानंतर नावाड्याने एका महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश आले नाही. अखेर नावाडी पोहून किनार्‍यावर आला. त्यानंतर त्याने या घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. आतापर्यंत एका महिलेचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे. 5 महिला अद्याप बेपत्ता आहेत. बचाव पथकाच्या मदतीने त्यांचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळी गावकर्‍यांची मोठी गर्दी जमली आहे. या घटनेत गणपूर येथील पोलीस पाटलाची पत्नीसुध्दा वाहून गेल्याची माहिती प्राप्त होत आहे.

COMMENTS