Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवडणुकीनंतर विधानपरिषदेच्या 6 जागा रिक्त

मुंबई : राज्यात महायुतीने अभुतपूर्व असा विजय मिळवला असून तब्बल 230 जागांवर विजय मिळवला आहे. मात्र या निवडणुकीत विधानपरिषदेवर आमदार असलेल्या अनेका

वंचित बहुजन आघाडीचा ओबीसी संवाद उत्साहात
कोविड लसीकरणाचे उद्दिष्ट मिशन मोडवर पूर्ण करा – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकाचा मृत्यू

मुंबई : राज्यात महायुतीने अभुतपूर्व असा विजय मिळवला असून तब्बल 230 जागांवर विजय मिळवला आहे. मात्र या निवडणुकीत विधानपरिषदेवर आमदार असलेल्या अनेकांनी ही विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यातील 6 जण विजयी झाल्यामुळे ते विधानपरिषदेच्या राजीनामा देणार असल्यामुळे विधानपरिषदेच्या 6 जागा रिक्त होणार आहेत. त्यामुळे या 6 जागांवर कुणाची वर्णी लागते, याची अनेकांना उत्सुकता आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेकांना डावलून इतरांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे अनेकांनी बंडखोरी केली. परंतु, काही ठिकाणी पक्ष श्रेष्ठींना बंडखोरी रोखण्यात यश आले. त्यामुळे निवडणुकीत ज्या नाराज नेत्यांना डावलण्यात आले होते, त्यांना आता विधानपरिषदेवर संधी दिली जाऊ शकते. सध्या भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रविण दटके हे विधान परिषदेवर असलेले नेते विधानसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यामुळे विधान परिषदेत भाजपच्या 4 जागा रिक्त झाल्या आहेत. तर शिवसेनेचे आमशा पाडवी हे विधानसभेवर निवडून आल्यामुळे त्यांचीही एक जागा रिक्त झाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश विटेकर हे देखील विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे विधान परिषदेवर अजित पवार गटाची एका जागा रिक्त झाली.

COMMENTS