Homeताज्या बातम्यादेश

सिक्कीममध्ये भूस्खलनात 6 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली ः देशामध्ये सध्या दोन प्रकारची परिस्थिती बघायला मिळत आहे. उत्तरेकडील राज्यात प्रचंड उकाडा दिसून येत आहे. तर दुसरीकडे ईशान्येकडील राज्य

मिठाच्या कणापेक्षाही छोटी बॅग
गोदावरीच्या उजव्या कॅनालमध्ये बुडून वृद्धाचा मृत्यू
चेतन पिपाडा बनले कमर्शियल पायलट

नवी दिल्ली ः देशामध्ये सध्या दोन प्रकारची परिस्थिती बघायला मिळत आहे. उत्तरेकडील राज्यात प्रचंड उकाडा दिसून येत आहे. तर दुसरीकडे ईशान्येकडील राज्यांत मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उत्तर सिक्कीममधील अनेक भागात मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहे. भूस्खलन आणि पुरात शेकडो घरे आणि अनेक रस्ते वाहून गेले आहेत. आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
सिक्कीममधील मंगन जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. एका दिवसात 220 मिमीपेक्षा जास्त पावसामुळे गेल्या वर्षी 4 ऑक्टोबरला आलेल्या भीषण पुरानंतर बांधलेला सांगकलंग पूलही गुरुवारी दुपारी कोसळला. त्यामुळे झोंघू, चुंगथांग, लाचेन आणि लाचुंगचा संपर्क तुटला आहे. या भागात आता ना फोन कनेक्टिव्हिटी आहे ना रस्ते. विजेचे खांबही वाहून गेले आहेत. सिक्कीममध्ये मदत आणि बचाव कार्यात गुंतलेल्या आपत्ती व्यवस्थापन अधिकार्‍यांनी सांगितले की, लाचुंग आणि चुंगथांग या पर्यटन स्थळांमध्ये सुमारे 2 हजार पर्यटक अडकले आहेत. आता केवळ हेलिकॉप्टरनेच त्यांची सुटका होऊ शकते, मात्र सध्या हेलिकॉप्टरने उड्डाण करणे शक्य नाही. दुसरीकडे, दक्षिण सिक्कीममध्ये तिस्ता नदीला पूर आला असून, अनेक घरे वाहून गेली आहेत. गेल्या वर्षी, उत्तर सिक्कीममधील हिमनदी तलाव फुटल्यामुळे आलेल्या अचानक आलेल्या पुरात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

COMMENTS