Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इर्शाळवाडीतील 57 बेपत्ता ग्रामस्थांना मृत घोषित

अलिबाग/प्रतिनिधी ः रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी या आदिवासी वाडीवर 19 जुलैच्या मध्यरात्री दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत संपूर्

मराठा आरक्षणासाठी एकाची आत्महत्या
ईडीची कारवाई चुकीची ः ईश्‍वरलाल जैन
गौतमी पाटीलचे सिंधुदुर्गमधील कार्यक्रम रद्द

अलिबाग/प्रतिनिधी ः रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी या आदिवासी वाडीवर 19 जुलैच्या मध्यरात्री दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत संपूर्ण गाव गाडले गेले होते. इर्शाळवाडी उंचावर असल्यामुळे मृतदेह काढण्यासाठी कोणतीही यंत्रणा नेण्यात यश नव्हते. या दुर्घटनेत 27 जणांचे मृतदेह काढण्यात बचाव पथकाला यश आले होते. पाऊस आणि परिसरात सुटलेली दुर्गंधी यामुळे शोध मोहीम शासनाने थांबवली होती. 57 जण बेपत्ता असल्याचे शासनाने घोषित केले होते. दरडीखाली गाडले गेलेल्या 57 जणांना मृत घोषित करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. प्रशासनाच्या या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली असून 57 जणांना मृत घोषित केले आहे. मृताच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतही मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत उपसचिव संजय धारूरकर यांनी कोकण आयुक्त व जिल्हाधिकारी रायगड यांना पत्राद्वारे कळविले आहे. इर्शाळवाडीत 47 घरांमध्ये 228 ग्रामस्थ राहत होते. 19 जुलैची रात्र या सर्वांसाठी काळरात्र ठरली होती.

COMMENTS