Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासनाच्या आनंदाचा शिधामध्ये 55 लाखांचा घोटाळा

धान्य दुकानदारांच्या बैठकीत उघडकीस गुन्हा दाखल करण्याचा निर्णय

पाथर्डी ःशासनाच्या आनंदाचा शिधा प्रकरणात जवळपास 55 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे बुधवारी स्वस्त धान्य दुकानदारांच्या बैठकीत उघडकीस आले असून या प्र

मीनाक्षी अवचरे यांना राज्यस्तरीय झाशीची राणी पुरस्कार प्रदान
कोरोना दहनचा संकल्प करुन… सदभावनेची गुढी उभारुया- घोडके
थोरात कारखान्याकडून 10 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

पाथर्डी ःशासनाच्या आनंदाचा शिधा प्रकरणात जवळपास 55 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे बुधवारी स्वस्त धान्य दुकानदारांच्या बैठकीत उघडकीस आले असून या प्रकरणी पुरवठा विभागात पूर्वी कार्यरत असलेल्या काकासाहेब सानप या तरुणावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.
        या संदर्भात मंगळवारी संघटनेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब ढाकणे यांच्या कोरडगाव रोडवरील कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस ढाकणे यांच्यासह संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी मोहिते,विष्णुपंत ढाकणे,महादेव कुटे,दिलीप वांढेकर,सुरेश नागरे,महादेव दहिफळे,गोरक्ष दहिफळे,विकास लवांडे,महादेव पवार,मारुती राठोड,मेजर अर्जुन शिरसाठ,मेजर साहेबराव गीते व जवळपास 75 दुकानदार उपस्थित होते.या वेळी अनेकांनी या घटनेला महसूल व पुरवठा विभागाचे अधिकारी जबाबदार असून सानपला आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये कोणी घेतले,सानप याचे बँकेतील व मोबाईल मधील व्यवहार तपासल्यास त्याने कोणत्या अधिकार्‍याला किती पैसे दिले ते बाहेर येईल.पुरवठा शाखेत काम करणार्‍या अधिकार्‍यांची सानप यांच्या कडे पैसे देण्यास सांगितले होते व त्या नुसार आम्ही पैसे दिले मग आमचा काय दोष आहे. आनंदाच्या शिध्याचे पहिल्या हप्त्याचे आमचे पैसे थकले होते तर मग आम्हाला पुन्हा दोन वेळा का शिधा दिला.आम्हाला जो माल दिला जातो त्याचे वजन कमी असते.हमाली देण्याचे आमचे काम नसतानाही आमच्याकडून हमाली घेतली जाते.माल कमी मिळतो याची माहिती व्हाट्सअप ग्रुपवर टाकल्यावर अधिकारी दमदाटी करतात.आम्ही सानप याचेकडे पैसे देऊनही आम्हाला पैसे भरा अशा नोटिसा का पाठवल्या अशा प्रश्‍नांची सरबत्ती दुकानदारांनी करत या प्रकरणी आम्ही पैसे भरणार नसून सानप याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा तर वेळ पडल्यास सामूहिक राजीनामे देण्याचाही निर्णय घेण्यात आला.
          या वेळी अनेकांनी आपल्या मोबाईल मधून सानप याला जे पैसे पाठवले होते त्या व्यवहाराची कागदपत्रे या बैठकीत दाखवली.या बैंठकीत कोणत्या दुकानदारांनी किती पैसे सानप याला दिले याची यादी केली असता जवळपास 55 लाख रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आले तर ज्या दुकानदारांनी आनंदाच्या शिध्याचे सर्व पैसे भरूनही त्यांना पुरवठा शाखेने पैसे भरण्याच्या नोटीसा पाठवल्याने पुरवठा विभागातील सावळा गोंधळ उघडकीस आला.

COMMENTS