Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील महिलेची 53 लाखांची फसवणूक

परदेशातील पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडल्याचे सांगून घातला गंडा

पुणे/प्रतिनिधी ः  एका 25 वर्षीय तरुणी आणि तिच्या आईला तुमचे मुंबई ते तैवान दरम्यानचे पार्सल पाठवण्यात आले असून त्यामध्ये अमली पदार्थ सापडल्याचे स

दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती | LOKNews24
शहर काँग्रेस राहणार…मनपा विरोधक ;मंत्री थोरातांनी दिले संकेत, शिवसेना-राष्ट्रवादीसमोर राहणार आव्हान
पंतप्रधानांचे भाऊ प्रल्हाद मोदी अपोलोत दाखल

पुणे/प्रतिनिधी ः  एका 25 वर्षीय तरुणी आणि तिच्या आईला तुमचे मुंबई ते तैवान दरम्यानचे पार्सल पाठवण्यात आले असून त्यामध्ये अमली पदार्थ सापडल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे मुंबईमधून आपण बोलत असून आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यामुळे आपल्या बँक खात्याची खातरजमा करण्याच्या बहाण्याने संबंधित तरुणीची व आईची तब्बल 53 लाख 63 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारक, स्काईप प्रोफाइल धारक तसेच पंजाब नॅशनल बँकेचा एक खातेदार यांच्या विरोधात सायबर पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,तक्रारदार तरुणीला अज्ञात व्यक्तीने पाच जुलै रोजी संपर्क साधला. आपण मुंबई एंटी नार्कोटीक्स विभागतून बोलत असल्याचे सांगून ,तशा प्रकारचा स्काईप प्रोफाइल नाव असलेले स्काईप अकाउंट धारक याने फेडेक्स कंपनी व पोलिस असल्याची बतावणी केली. तसेच तरुणीच्या नावाने मुंबई ते तैवान पार्सल पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये अमली पदार्थ सापडलेले आहेत असे सांगून याप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी तसेच तक्रारदार व तिच्या कुटुंबियांचे बँक खाते व्हेरिफाय करण्याचे सायबर भामट्यानी सांगितले. त्यानुसार तक्रारदार हिच्या आईला 53 लाख 63 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगून त्यांची सदर रकमेची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत करत आहे.

COMMENTS