Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

द्राक्षांच्या बागेवरील प्लास्टिकसाठी 50 टक्के अनुदान द्यावे ः खा. शरद पवार

पुणे/प्रतिनिधी : जागतिक तापमान वाढीमुळे नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढले आहे. त्यापासून संरक्षण करण्यासाठी द्राक्षांच्या बागावर प्लास्टिकच्या आच्छा

कांदा निर्यातबंदी दिल्लीश्‍वरांना उठवावीच लागेल
..तर, महाराष्ट्र पेटून उठेल – शरद पवार
भाजपसोबत जाण्याचा प्रश्‍नच नाही

पुणे/प्रतिनिधी : जागतिक तापमान वाढीमुळे नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढले आहे. त्यापासून संरक्षण करण्यासाठी द्राक्षांच्या बागावर प्लास्टिकच्या आच्छादनाची गरज आहे. त्याकरिता राज्य सरकारने कमीत-कमी 50 टक्के अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री, ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी व्यक्त केले. तसेच कांद्याच्या चाळीप्रमाणे बेदाणाचाळ उभारण्यासाठी केंद्र सरकारने अनुदान द्यावे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या वतीने आयोजित 63 व्या द्राक्ष परिषद 2023 च्या उद्घाटन प्रसंगी पवार बोलत होते. वाकड येथे रविवारी झालेल्या परिषदेला फलोत्पादक संचालक डॉ. कैलास मोते, बागाईतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, उपाध्यक्ष कैलास भोसले, सुनील पवार, चंद्रकांत लांडगे उपस्थित होते. खा. शरद पवार म्हणाले, द्राक्ष हे नाजूक पीक आहे. जागतिक तापमानवाढीमुळे अतिथंडी, उष्णतेच्या झळा, अवकाळी, गारपीटीसारख्या नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढले आहे. गारपीटीचे संकट, नैसर्गिक आपत्ती आल्यास द्राक्ष उत्पादक शेतकरी अतिशय संकटात येतो. नैसर्गिक आपत्ती आल्यास द्राक्ष शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होते. ते टाळण्यासाठी द्राक्षांच्या बागेवर प्लास्टिकच्या आच्छादनाची गरज निर्माण झाली आहे. त्याकरिता राज्य सरकारने कमीत कमी 50 टक्के अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे. द्राक्ष उत्पादक शेतकरी अतिशय कष्टाळू आहे. आधुनिकेतचा विचार करणारा शेतकरी आहे. त्यामुळे इतर पीक घेणार्‍यांपेक्षा द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांचे जीवनमान बदलले आहे. राज्यात साडेचार लाख एकरावर द्राक्ष लागवड आहे. द्राक्षाला बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी राज्य, केंद्र शासनाचे धोरण आणि नाफेड संस्था हा महत्त्वाचा घटक आहे. द्राक्षाचे अचूक क्षेत्र किती आहे, याची माहिती राज्य सरकारने घ्यावी, असे आवाहन पवार यांनी केले.

COMMENTS