Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दूध उत्पादकांना प्रति लिटर 50 पैसे रिबेट व भेटवस्तू ; राहात्यातील पंचकृष्णा डेअरीने केली दिवाळी गोड

राहाता : येथील पंचकृष्णा डेअरीच्या वतीने दूध उत्पादकांना प्रति लिटर 50 पैसे रिबेट तसेच भेटवस्तू सह वर्षभरात दिलेल्या दुधाचे गुणवत्ता प्रत मधील सर

Ahmednagar : किरण काळे अदखलपात्र आहे तर जगतापांनी १ कोटीची नोटीस का पाठवली (Video)
आ. तांबे यांची स्टेअर्स महाराष्ट्र गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड
मशीराने धरला रमजानचा उपवास

राहाता : येथील पंचकृष्णा डेअरीच्या वतीने दूध उत्पादकांना प्रति लिटर 50 पैसे रिबेट तसेच भेटवस्तू सह वर्षभरात दिलेल्या दुधाचे गुणवत्ता प्रत मधील सर्वोत्कृष्ट गुण प्रतीच्या पहिल्या पाच दूध उत्पादकांना विशेष पुरस्कार देत दूध उत्पादकांची दिवाळी गोड केली आहे.
राहाता पंचक्रोशी मध्ये गेल्या 40 वर्षापासून दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या सहकार्याने दूध व्यवसायात अग्रेसर असलेल्या सुनील शांताराम सदाफळ यांचे पंचकृष्णा डेअरी व पंचकृष्णा डेअरी प्रोडक्स यांच्यावतीने दूध खरेदी बरोबर अद्यावत मशनरीने तयार केलेल्या विविध दर्जेदार दूध उत्पादनांची जिल्हाभरात 800 पेक्षा जास्त स्टॉलवर विक्री करताना ग्राहकांच्या पसंतीस विविध पंचकृष्णा प्रोडक्स उतरले आहेत. राहाता व परिसरातील दूध उत्पादक नियमित चांगल्या प्रतीचे दूध पंचकृष्णा डेअरीस देत असल्याने यावर्षीपासून सर्व दूध उत्पादकांना गेल्या वर्षात दिलेल्या दुधाच्या प्रतिलिटरला 50 पैसे रिबेट तसेच वर्षभरात सातत्याने चांगल्या दुधाचा पुरवठा केलेल्या पहिल्या पाच दूध उत्पादकांना पारितोषक व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये प्रथम गजानन सकाहरी सदाफळ, द्वितीय संपतराव कचरू हिंगे, तृतीय सचिन नामदेव त्रिभुवन, चतुर्थ उज्वला भाऊसाहेब निधाने व पाचवे कावेरी सतीश मोरे हे दूध उत्पादक विजेते ठरले. यावेळी सुनील सदाफळ म्हणाले की पंचकृष्ण डेअरी मार्फत लवकरच एक शिबिर आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये जनावर खरेदीसाठी आर्थिक सहाय्य तसेच शासकीय योजना बाबत माहिती याशिवाय तज्ज्ञ डॉक्टरांच्या वतीने जनावरांचे आजार,दुधाला चांगली गुण प्राप्त होण्यासाठीचे उपाय तसेच जनावरांसाठी योग्य आहार याबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहे. यापुढेही संस्थेच्या वतीने आम्ही दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी दर दिवाळीला रिबिट व चांगली गुणवत्ता असणार्‍यांचा सन्मान करून बक्षिसे देण्याचा मानस आहे तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन वेंदे यांनी जनावरांच्या विविध आजार व उपचार तसेच जनावरांची घ्यायची काळजी यासंदर्भात उपयुक्त अशी माहिती दिली पत्रकार दिलीप खरात यांनी कृषी पंडित स्वर्गीय शांताराम बापू सदाफळ यांच्या आठवणींना उजाळा देत सदाफळ परिवाराने पंचकृष्णा डेअरी ने शेतकरी चांगल्या दर्जेदार प्रतीची उत्पादने देऊन ग्राहकांची पसंती प्राप्त केली आहे. यावेळी पत्रकार रामकृष्ण लोंढे तसेच भाऊसाहेब सदाफळ यांनीहीुभेच्छा देत पंचकृष्णाच्या कार्याचा गौरव केला. यावेळी बोधने, बाळासाहेब आग्रे, डॉ. राजेंद्र चोळके, डॉ. संजय डांगे, प्रदीप काळे, मधुकर लोहाटे, राज सदाफळ,सुदर्शन सदाफळ, अक्षय हिंगे, कृष्णा बोंडे, सुबोध बोठे, विनायक रोहम कु.श्रृती सदाफळ कु.सृष्टी सदाफळ आधी शेतकरी दूध उत्पादक, दूध डेअरीचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS