Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परभणीत सेप्टिक टँक स्वच्छ करताना 5 जणांचा मृत्यू

एका कामगारावर उपचार सुरु

परभणी प्रतिनिधी- परभणीतून एक धक्कादायक, दुदैर्वी व हळहळणारी घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात दु:ख व हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. परभणीच्या

वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा    
नऊ निलंबित पोलीस पुन्हा झाले सेवेत रुजू
दीपाली चव्हाण प्रकरणाचा तपास महिला आयपीएस अधिकाऱ्यांमार्फत करा : प्रविण दरेकर

परभणी प्रतिनिधी- परभणीतून एक धक्कादायक, दुदैर्वी व हळहळणारी घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात दु:ख व हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा शिवारात सेप्टिक टँक साफ करण्यासाठी टँकमध्ये उतरलेल्या पाच मजुरांचा गुदमुरुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या मजुरांचा गुदमरून मृत्यूनंतर याचा मृत्यू गुदमरुन झाला की गाळात अडकून मृत्यू झाला याबाबत विचारणा होत आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री अंधारात हे कामगार सेफ्टी टॅक साफ करत होते. याचवेळी हा दुर्दैवी प्रकार घडला. यात मुत्युमुखी पडलेल्यांची नावे शेख सादेक 45, शेख शाहरुख 20, शेख जुनेद 29, शेख नविद 25 आणि शेख फिरोज 25 अशी या दुर्देवी घटनेतील मृतांची नावे आहेत. तर शेख साबेर हा जखमी झाला आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. हे कामगार सेप्टिक टँक साफ करण्यासाठी उतरले ते परत आलेच नाहीत. आले ते त्यांचे मृतदेह. रात्रीचा अंधार असल्याने हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS