Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परभणीत सेप्टीक टँकमध्ये 5 जणांचा मृत्यू

परभणी : परभणी जिल्ह्यातील सोनेपेठ तालुक्यामधील तांडा शिवारात सेफ्टी टँक स्वच्छ करताना 5 कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. याठिकाणी गु

माजी राज्यपाल मलिक यांच्या घरी सीबीआयचे छापे
कोर्टाच्या निर्णयावर भुजबळांनी केला मोठा आरोप | LOKNews24
शेतकऱ्याच्या शेतात सापडली 47 पोती l पहा LokNews24

परभणी : परभणी जिल्ह्यातील सोनेपेठ तालुक्यामधील तांडा शिवारात सेफ्टी टँक स्वच्छ करताना 5 कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. याठिकाणी गुरुवारी रात्री हे कामगार सेफ्टी टँक स्वछ करण्यासाठी आत उतरले होते. यावेळी 5 जणांचा मृत्यू झाला असून एक जण अत्यवस्थ आहे.
परभणीत सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा या शिवारातील ही घटना घडली. एका शेतातील घराच्या सेफ्टीक टँक स्वच्छ करण्याचे कंत्राट परभणी आणि सोनपेठ मधील काही कामगारांनी घेतले होते. काल (11 मे) रात्री शेख सादेक, शेख जुनेद, शेख शाहरूख, शेख नवीद, शेख फेरोज, शेख साबेर हे सहा जण सेफ्टीक टँक स्वच्छ करत होते. दरम्यान, सेफ्टी टँकची स्वच्छता करताना विषारी वायूमुळे टँक स्वच्छ करणार्‍या कामगारांची जीव गुदमरला. या घटनेत शेख सादेक (वय 55), शेख जुनेद  (वय 32) शेख शारोक (वय 28), शेख नवीद  (वय 28), शेख फेरोज (वय 29) यांचा मृत्यू झाला तर शेख साबेर (वय 18) हा अत्यवस्थ असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

मृतांच्या वारसांना 10 लाखाची मदत – परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरानजीक भाऊचा तांडा येथे काल सेप्टिक टँकमधील मैला स्वच्छ करताना पाच जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या वारसांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या यासंदर्भातील योजनेतून प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेतील जखमी झालेल्या कामगारावर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार शासनाच्या खर्चातून करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

COMMENTS