गाझियाबाद ः गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये आगीच्या घटना समोर आल्या असतांनाच, उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये शॉर्ट सर्किटमुळे तीन मजली इमारतील

गाझियाबाद ः गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये आगीच्या घटना समोर आल्या असतांनाच, उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये शॉर्ट सर्किटमुळे तीन मजली इमारतीला भीषण आग लागली. या अपघातात पती, पत्नी आणि मुलीसह 5 जण जिवंत जाळले. 2 जण गंभीर भाजले. हाजीपूर बाम्हैता गावात बुधवारी रात्री ही घटना घडली. घरात फोम ठेवला होता, त्यामुळे आग वेगाने पसरली आणि कोणालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि घरातून 2 महिला, 1 पुरुष आणि 2 मुलांचे मृतदेह बाहेर काढले. एक महिला आणि मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
COMMENTS