पुणे : आयफोन खरेदी करून देत असल्याचे सांगून एकाची पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना 25 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर या कालावधीत पिंपरी येथे
पुणे : आयफोन खरेदी करून देत असल्याचे सांगून एकाची पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना 25 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर या कालावधीत पिंपरी येथे घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी परिसरात घडलेल्या या फसवणूकीच्या प्रकरणात जगदीश नथुराम आसवाणी यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रेहमान अब्दुल जब्बर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना पाच आयफोन खरेदी करून देतो, असे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादीकडून पाच लाख रुपये घेतले. आरोपीने फिर्यादी यांच्या नावावर आयफोन देखील खरेदी केले. मात्र, त्यांना न पाठवता कुरिअरमध्ये आयफोन गहाळ झाले असे कारण सांगितले.
COMMENTS