Homeताज्या बातम्यादेश

देशभरात 5 लाख 94 हजार 620 किलो अंमली पदार्थ जप्त

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने ‘अंमली पदार्थ-मुक्त भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी अंमली पदार्थांविरुद्ध

पुण्यात अल्पवयीन मुलावर तलवारीने वार
ऐन सणासुदीत साखर महागणार
मेक्सिकोत प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली; २७ जणांचा मृत्यू..

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने ‘अंमली पदार्थ-मुक्त भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी अंमली पदार्थांविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’अर्थात शून्य सहिष्णुतेचे धोरण स्वीकारले आहे. 1 जून 2022 पासून सुरू झालेल्या 75 दिवसांच्या अभियानांतर्गत एकंदर 75,000 किलो अंमली पदार्थ नष्ट करण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले होते, मात्र आतापर्यंत प्रत्यक्षात 5,94,620 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून हा आकडा उद्दिष्टापेक्षा कित्येक पटीने अधिक आहे. तसेच नष्ट करण्यात आलेल्या एकूण जप्त अंमली पदार्थांपैकी 3,138 कोटी रुपये किमतीचे 1,29,363 किलोग्राम अंमली पदार्थ एकट्या एनसीबीने नष्ट केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने अंमली पदार्थांची समस्या सोडविण्यासाठी संस्थात्मक रचना मजबूत करणे, अंमली पदार्थ नियंत्रणासाठी कार्यरत असणार्‍या सर्व संस्थांमध्ये समन्वय निर्माण करून त्यांचे सशक्तीकरण करणे आणि अंमली पदार्थांच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी व्यापक जनजागृती अभियान हाती घेणे अशा त्रिसूत्रीचा स्वीकार केला आहे. अंमली पदार्थांची तस्करी हा विषय केवळ केंद्राचा किंवा राज्यांचा विषय नसून तो राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे आणि म्हणूनच त्यावर उपाय शोधण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आणि एकत्रित असले पाहिजेत. अंमली पदार्थांच्या धोक्याचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी, सर्व राज्यांनी नियमितपणे जिल्हा-स्तरीय आणि राज्य-स्तरीय राष्ट्रीय नारकोटिक्स समन्वय पोर्टलची बैठक बोलावली पाहिजे. अंमली पदार्थांच्या विरोधातील या लढ्यात अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेऊन पुढील मार्गक्रमण करायला हवे, ड्रोनचा वापर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अफूची लागवड करणारी क्षेत्र ओळखण्यासाठी  आणि त्यावर नियंत्रणा ठेवण्यासाठी सॅटेलाईट मॅपिंगसारखे उपाय तत्परतेने केले  पाहिजे. या पदार्थांच्या पुरवठ्याच्या स्त्रोतापासून गंतव्यस्थानापर्यंत कसून चौकशी केली पाहिजे,  जेणेकरून अंमली पदार्थांचे संपूर्ण जाळेच नष्ट करता येईल.

COMMENTS