Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात 5 कोटींची कामे मंजूर ः आमदार मोनिका राजळे

पाथर्डी/प्रतिनिधी ः शेवगांव-पाथर्डी विधानसभा  मतदारसंघातील तालुक्यातील विविध विकास कामांसाठी ग्रामविकास विभागाकडून निधी मिळणेसाठी ग्रामविकास मंत्

यशवंत स्टडी क्लबच्या दोन विद्यार्थ्यांची सैन्य दलात निवड
नेवाशाच्या पावन गणपतीला भाविकांची चतुर्थीनिमित्त गर्दी
pathardi : गांजाची राखण करणाऱ्या दोन महिला पोलिसांच्या ताब्यात l LokNews24

पाथर्डी/प्रतिनिधी ः शेवगांव-पाथर्डी विधानसभा  मतदारसंघातील तालुक्यातील विविध विकास कामांसाठी ग्रामविकास विभागाकडून निधी मिळणेसाठी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचेकडे कामाची मागणी केली होती.त्यानुसार ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे लेखाशिर्ष 2515 अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी रु. 5 कोटीचा निधी शासन निर्णय प्र.क्र. 158/ योजना 6/ दि. 23 मार्च 2023 नुसार मंजूर झाला आहे. यामध्ये शेवगांव तालुक्यातील अंतरवली बु., ते उगले वस्ती खडीकरण व डांबरीकरण करणे रु. 40 लक्ष, मडके अंतर्गत लोखंडी पुल ते सुनिल वडघणे वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे रु. 40 लक्ष, कांबी येथील गांवअंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण करणे रु. 30 लक्ष, गोळेगांव अंतर्गत ढाकणे वस्ती रस्ता खडीकरण डाबरीकरण करणे रु. 30 लक्ष, मौजे दहिगांव ने, अंतर्गत देवळानी रोड ते काशिद वस्ती रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे रु. 30 लक्ष, मळेगांव, अतर्गत – कर्डिलबा ज्ञ् मनोज फरताळे वस्ती रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे रु. 40 लक्ष  तसेच पाथर्डी तालुक्यातील खरंवडी कासार, येथील जायभाय हॉस्पीटल ते चिंतामणी पर्यंत (जुना नांदूर रस्ता) सह पुलाचे काम करणे रु. 40 लक्ष, कोरडगांव गांव अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण व बंदीस्त गटार बांधणे रु. 40 लक्ष, हनुमानटाकळी अंतर्गत तिरमल वस्ती ते कोपरे वस्ती शिव रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे रु. 50 लक्ष, ढवळेवाडी अंतर्गत दुसंग वस्ती रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे रु. 30 लक्ष, अकोले ता. पाथर्डी अंतर्गत करोडी रोड ते दातीरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. रु. 35 लक्ष, येळी अंतर्गत बडेवाडी, खंडोबाडगर ते पाझर तलाव मार्ग टोल प्लाझा रस्ता मुरुम भराव व खडीकरण करणे रु. 25 लक्ष त्याच बरोबर पुढील स्थगीती मिळालेल्या 2 कामांनाही या शासन निर्णयात मंजूरी मिळालेली आहे. त्यामध्ये जवखेडे खालसा, ता.पाथर्डी अंतर्गत तांबुळदेव रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे रु. 30 लक्ष, भालगांव ता.पाथर्डी अंतर्गत भालेश्‍वर हायस्कुल ते  मच्छिद्रनाथगड रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे रु. 40 लक्ष या कामाचा समावेश आहे. सदर कामे मंजूर होणेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील यांचे सहकार्य लाभले.

COMMENTS