Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वर्क फ्रॉम होम’च्या नादात ४६ लाख गमावले

सेवानिवृत्त व्यक्तीसह दोघांची फसवणूक

नाशिक प्रतिनिधी - शहरात राहणाऱ्या सेवानिवृत्त व्यक्तीसह आणखी दोघांना घरातून काम केल्यास चांगल्या परताव्याचे आमीष दाखवून सायबर चोरट्यांनी गंडा

राहुरीत पतसंस्थेत 46 लाखांचा अपहार
गुंतवणुकीचे आमिष दाखवून 39 लाखांची फसवणूक
पुण्यात गुंतवणुकीच्या आमिषाने 38 लाखांची फसवणूक

नाशिक प्रतिनिधी – शहरात राहणाऱ्या सेवानिवृत्त व्यक्तीसह आणखी दोघांना घरातून काम केल्यास चांगल्या परताव्याचे आमीष दाखवून सायबर चोरट्यांनी गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिघांच्या फसवणुकीची पद्धत सारखी असून, ४६ लाख रुपयांना चोरट्यांनी या तिघांची फसवणूक केली. याप्रकरणी तिघांच्या फिर्यादीवरून सायबर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात शेअर ट्रेडिंग आणि वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून नागरिकांना फसविण्याचे प्रकार ऑनलाइन स्वरुपात घडत आहेत. या माध्यमातून नाशिकमधील तीन व्यक्तींना टेलिग्राम ॲपद्वारे संपर्क साधत फसविल्याचे प्रकार घडला. त्यानुसार पाथर्डी फाटा परिसरातील मदन रामभाऊ काळे (वय ६०) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यांना व्हॉट्सॲप व टेलिग्रामवर शेअर ट्रेडिंगसह वर्क फ्रॉम होमद्वारे पैसे कमाविण्यासंदर्भात मेसेज आला. त्यांनी २५ नोव्हेंबर २०२३ ते २ जानेवारी २०२४ या वेगवेगळ्या लिंकद्वारे पैसे भरले. ३१ लाख ९२ हजार रुपये काळे यांनी आतापर्यंत जमा केले. तर भगूर येथील पवन लक्ष्मण कदम यांनी सहा लाख १२ हजार रुपये भरले. यासह अमृतधाम येथील जगदीश देवराम कुटे यांनी ७ लाख ६१ हजार रुपये भरले आहेत. या तिघांच्या फिर्यादीवरून सायबर पोलिसांनी एकत्रित गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

COMMENTS