देवळाली प्रवरा ः राहुरी येथील राजमाता नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये 46 लाखांचा अपहार झाल्याचे पुढे आले असून बँकेत रक्कम शिल्लक नसताना ताळेबंदात शिल्
देवळाली प्रवरा ः राहुरी येथील राजमाता नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये 46 लाखांचा अपहार झाल्याचे पुढे आले असून बँकेत रक्कम शिल्लक नसताना ताळेबंदात शिल्लक दर्शवून अपहार तसेच करण्यात आला पतसंस्थेतील पदाधिकारी, कर्मचारी यांनी मिळून ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याचेही यातून पुढे आले आहे.
या पतसंस्थेत तब्बल 46 लाख 45 हजार 798 रूपये 90 पैसे एवढ्या रक्कमेचा अपहार गैरव्यवहार, गैरवापर करण्यात आला आहे. याबाबत सनदी लेखापरीक्षक सुरेश ज्ञानदेव डौले, रा.केशर मंगल कार्यालय जवळ, मल्हारवाडीरोड, राहुरी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, राजमाता नागरी सहकारी पतसंस्था, राहुरी या संस्थेचे 1 एप्रिल 2021 ते 21 मार्च 2023 या कालावधीत लेखापरीक्षण जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था तसेच लेखापरीक्षण अहवाल यानुसार सदर पतसंस्थेत झालेल्या या गैरप्रकाराची माहिती अहवालात सादर करण्यात आली आहे. त्यात 31 मार्च 2023 अखेरची हातावरील रोख शिल्लक रक्कम 10 लाख 34 हजार 433, 31 मार्च 2023 अखेर मुदत ठेव जमा नसताना ठेवीदारांकडे असणार्या पावत्यांची 17 लाख 3 हजार 836 रूपये रक्कम,31 मार्च 2023 अखेर बँकेत प्रत्यक्ष रक्कम शिल्लक नसताना ताळेबंदात शिल्लक दर्शवलेली रक्कम 3 लाख 82 हजार 742 रूपये 80 पैसे तसेच वैयक्तिक सेव्हींग ठेव, दैनिक बचत खाते, नावे शिल्लक व बाकी शिल्लक नसतानाही काढलेली रक्कम 10 लाख 23 हजार 334 रूपये अशी एकूण 46 लाख 45 हजार 798 रूपये 90 पैसे एवढ्या रक्कमेचा या संस्थेतील पदाधिकारी, कर्मचारी यांनी मिळून ठेवीरांची आर्थिक फसवणूके केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या फिर्यादीवरून पतसंस्थेचे मॅनेजर कारभारी बापूसाहेब फाटक, मु.पो. टाकळीमिया, चेअरमन भाऊसाहेब तुकाराम येवले, मु.पो.नांदूररोड, राहुरी, व्हा. चेअरमन शरदराव लक्ष्मण निमसे, रा. नगर-मनमाड रोड, अस्तगावमाथा, दैनिक बचत प्रतिनिधी सुनील नारायण भोंगळ,रा. जोगेश्वरी आखाडा, कॉम्प्युटर ऑपरेटर उत्तम दत्तात्रय तारडे, मु.पो. केंदळ बु., कॅशियर सुरेखा संदीप सांगळे, रा.राहुरी, संचालक मंदाताई शरद निमसे, रा. अस्तगावमाथा, ता. राहाता, संचालक दादाभाऊ यादव, रा.राहुरी विद्यापीठ, संचालक वसंतराव कृष्णराव झावरे, रा.राहुरी, संचालक संजय एकनाथ शेळके, रा.राहरी खुर्द, संचालक किशोर सखाराम जाधव, रा.येवले आखाडा, संचालक मंगलताई भाऊसाहेब साबळे, रा.राहुरी. संचालक प्रतिभाताई संजय पवार, रा.राहुरी, स्विकृत संचालक दिपक सुकलाल बोरा, रा.राहुरी यांच्याविरूद्ध भादंवि कलम 34, 409, 420, 465, 477- अ, महाराष्ट्र ठेवीदारांच्या अधिनियम 1999 चे कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.
COMMENTS