Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरण प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र येथे ४५ प्रशिक्षणार्थींचे रक्तदान

नाशिक : महावितरणच्या प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र, एकलहरे  येथे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी अभियंता यांच्या पुढाकाराने प्रशिक्षण व सुरक्षा के

नांदेडमधील अपघातात 5 जणांचा मृत्यू
सुरक्षित दिवाळी साजरी करा : महावितरणचे आवाहन
हिमायतनगर शहरात जागोजागी  घाणीचे साम्राज्य
Displaying blood donation camp.jfif

नाशिक : महावितरणच्या प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र, एकलहरे  येथे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी अभियंता यांच्या पुढाकाराने प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र एकलहरे येथे  आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते, या शिबिरात एकूण ४५ रक्तदातांनी रक्तदान केले.
महावितरणच्या प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र, एकलहरे  येथे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी अभियंता यांनी अर्पण रक्तसंचलन  पतपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिर तसेच अशोका हेल्थकेअर  यांच्यामार्फत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजनकरण्यात आले  होते. सदर संकल्पना प्रशिक्षण व  सुरक्षा केंद्राचे मुख्य महाव्यवस्थापक अरविंद भादिकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक महाव्यवस्थापक दीप्ती आंबेकर, कार्यकारी अभियंते आनंदराव देशमुख, नरेंद्र सोनवणे, प्रमोद पाटील व प्राजक्ता कुलकर्णी, उपकार्यकारी अभियंते चरणसिंग इंगळे व भूपेंद्र गांगुर्डे यांनी शिबिरासाठी सहकार्य  केले. प्रशिक्षणार्थी अभियंते यांनी राबविलेल्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.

COMMENTS