45 नळ कनेक्शन तोडताच 2 लाख 65 हजारांची थकबाकी वसुल

Homeमनोरंजन

45 नळ कनेक्शन तोडताच 2 लाख 65 हजारांची थकबाकी वसुल

तडवळे, ता. शिराळा येथील थकबाकी वसुलीसाठी 45 जणांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आली.

तुमचे आजचे राशीचक्र, शनिवार, २८ मे २०२२| LOKNews24
छत्रपती शिवाजी कॉलेजच्या तीन खेळाडूंना राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर
शिवरायांचा छावा’ चित्रपटातील नवं पोस्टर रिलीज

शिराळा तालुक्यातील तडवळे ग्रामपंचायतीच्या कारवाईला यश

शिराळा / प्रतिनिधी : तडवळे, ता. शिराळा  येथील थकबाकी वसुलीसाठी 45 जणांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आली. या कारवाईच्या धसक्याने एकाच दिवशी 2 लाख 65 हजार 870 रुपये वसुली झाली आहे. 

ग्रामपंचायत तडवळे येथे पंचायत समितीकडून वसुली पथक स्थापन करण्यात आले आहे. येथील घरपट्टी पाणीपट्टी चालू व थकीत रक्कम 16 लाख रुपये इतकी आहे. वसुली पथकाकडून एकाच दिवशी 45 नळकनेक्शन बंद करण्यात आले आहे. त्यापैकी दोन लाख 65 हजार 870 वसूल करण्यात आली. या वसुली पथकामध्ये विस्तार अधिकारी रवींद्र मटकरी, ग्रामसेवक अमोल बाबर, कुमार भिंगारदिवे, ग्रामविकास अधिकारी रमेश पाटील, दिग्विजय राऊत, महेश भोई, सतीश पाटील, सुधीर पाटील, राजू कांबळे, दिलीप डवरी, राजू काळे, सचिन मोरे, विकास वनारे, वसंत इंगवले, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा समावेश आहे. गटविकास अधिकारी अनिल बागल व सहाय्यक गटविकास अधिकारी अरविंद माने यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

COMMENTS