ढाका ः बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका या ठिकाणी गुरुवारी रात्री उशिरा एका सात मजली इमारतीला भीषण आग लागली. या घटनेत 44 जणांचा मृत्यू झाला आहे.

ढाका ः बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका या ठिकाणी गुरुवारी रात्री उशिरा एका सात मजली इमारतीला भीषण आग लागली. या घटनेत 44 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक होरपळून जखमी झाले आहेत. बांगलादेशचे आरोग्य मंत्री सामंत लाल सेन यांनी ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयाचा दौरा केला त्यानंतर माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. ढाका येथील रुग्णालयाच्या बर्न विभागात 40 जखमींवर उपचार सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली.
COMMENTS