मुंबई ः रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) कर्मचारी रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी नेहमीच आघाडीवर आहेत आणि चोवीस तास जागरुक आहेत. तसेच नियमित कर
मुंबई ः रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) कर्मचारी रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी नेहमीच आघाडीवर आहेत आणि चोवीस तास जागरुक आहेत. तसेच नियमित कर्तव्य बजावताना इतर रेल्वे कर्मचार्यांच्या मदतीने रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे प्रवाशांचे प्राणही वाचवले आहेत. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी मिशन जीवन रक्षक या मोहिमेचा एक भाग म्हणून मध्य रेल्वेवर एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत स्वतःचा जीव धोक्यात घालून आतापर्यंत 44 लोकांचे प्राण वाचवले आहेत.
या जीव वाचवणार्या घटनांचे दृष्य काही छापिल आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये खूप लोकप्रिय झाले आणि विविध समाज माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. या 44 घटनांपैकी एकट्या मुंबई विभागात जीव वाचवणाच्या एकूण 21 घटनांची नोंद झाली आहे. भुसावळ विभागात 15 घटना, पुणे विभागात 4 तर नागपूर विभागात 2 आणि सोलापूर विभागात 2 जीव वाचवण्याच्या घटनांची नोंद झालेली आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीत होणारा अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका तसेच रेल्वे मध्ये आणि रेल्वे परिसरात अंमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळवणे इत्यादी विविध सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो. आणि त्याप्रमाणे ते आपले लक्ष प्रवाशांच्या सुरक्षेवर केंद्रीत करून असतात. रेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतेने बहुतेक प्रकरणांमध्ये अशा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत, जे काहीवेळा मोठा निष्काळजीपणा करतात आणि धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना धोक्याचा पत्करतात. काही वेळा विविध वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न करताना देखील रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी लोकांचा जीव वाचवला आहे. शेवटी, एखाद्याचा जीव वाचवण्याच्या या कृतीचा, रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्यांप्रती आनंद आणि कृतज्ञता वाढवतो. कृपया ट्रेन सुटण्याच्या वेळापत्रकाच्या अगोदर स्थानकावर पोहोचणे. प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून चढू अथवा उतरू नये व आपला जीव धोक्यात घालू असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
COMMENTS