नवी दिल्ली : सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये बस चालवताना सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि रस्ते अपघात रोखण्यासाठी बस चालकांनी केलेल्या प्रयत्नांच
नवी दिल्ली : सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये बस चालवताना सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि रस्ते अपघात रोखण्यासाठी बस चालकांनी केलेल्या प्रयत्नांचा गौरव करण्याच्या उद्देशाने, ‘असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग्ज (एएसआरटीयू) ने आज नवी दिल्ली येथे ‘हिरोज ऑन द रोड’ असा पुरस्कार देवून 42 चालकांचा सत्कार केला. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सचिव अलका उपाध्याय यांनी त्यांच्या विनाअपघात, निर्दोष सेवेबद्दल कृतज्ञता म्हणून या कार्यक्रमासाठी देशभरातील 42 चालकांना त्यांच्या कुटुंबीयांसह सुरक्षा पुरस्कार प्रदान केले. यामध्ये पहिल्या 17 चालकांनी त्यांच्या एकूण सेवेत अपघात करता 30 वर्ष सेवा दिल्याची नोंद आहे.
COMMENTS