शिर्डी/प्रतिनिधी ः शिर्डी येथील एका हॉटेल व्यवसायिकाला गुजरात येथील तीन व्यापार्यांनी चाळीस कोटी कर्ज मिळून देतो असे आमीष दाखवत सुमारे 40 लाखाला
शिर्डी/प्रतिनिधी ः शिर्डी येथील एका हॉटेल व्यवसायिकाला गुजरात येथील तीन व्यापार्यांनी चाळीस कोटी कर्ज मिळून देतो असे आमीष दाखवत सुमारे 40 लाखाला गंडा घातला असून फसवणूक झालेल्या व्यक्तीने शिर्डी पोलिसात तीन व्यक्तींविरोधात फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच श्री शनि छत्र अर्बन जवळके मल्टी निधी लिमिटेड या निधी कंपनीच्या पदाधिकार्यांनी संगणमत करून ठेवीदारांचे 43 लाख 53 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल झाल्यानंतर आता परत अशाचे आमिष दाखवून 40 लाख रुपयाला शिर्डीतील हॉटेल व्यवसायिकाला फसवण्यात आले आहे. त्यामुळे शिर्डी व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, शिर्डी येथील विक्रम रावसाहेब गोंदकर यांनी याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की, गुजरात येथील धर्मेश पटेल, वसंत शहा व मित्तल चव्हाण अशा तीन व्यापार्यांनी 7 डिसेंबर ते 16 डिसेंबर 22 दरम्यान शिर्डी येथे आपल्या हॉटेलमध्ये येऊन, आपला विश्वास संपादन करून त्यांनी एम के इंटरप्राईजेस बडोदा गुजरात यांच्यामार्फत बडोदा बँक गुजरात यांच्याकडून 40 कोटीचे कर्ज तुम्हाला हॉटेल व्यवसायासाठी मिळवून देतो. असे आमिष दाखवत हे 40 कोटी कर्ज मिळवण्यासाठी लागणारी कर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपणाकडून या गुजरातच्या तीन व्यापार्यांनी वेळोवेळी आर टी जी एस द्वारे सुमारे 39 लाख 55 हजार घेतले. मात्र कर्ज मिळून देण्यासाठी रक्कम घेतली असतानाही त्यांनी 40 कोटी कर्ज मिळवून दिले नाही.
त्यांनी त्यांच्या एम के इंटरप्राईजेसला कुलूप लावून ते फरार झाले. त्यामुळे आपली खात्री झाली की आपण फसलो गेलो आहोत..40 कोटी कर्जाची अपेक्षा दाखवून त्यांनी आपल्याकडून 40 लाख रुपये घेतले व आपली आर्थिक फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर गुजरातच्या मित्तल चव्हाण, वसंत शहा व धर्मेश पटेल या तीन व्यापार्यां विरोधात विक्रम रावसाहेब गोंदकर यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीसांनी तीन आरोपी विरोधात भादवि कलम 406,420,/34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. शिर्डी व परिसरात असे वेगवेगळे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे यापुढे नागरिकांनीही दक्ष राहण्याची गरज असुन अशा भूल थापा किंवा आमिषाला बळी पडू नये. असे आवाहन पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
COMMENTS