दुकानातल्या आईस्क्रीमच्या फ्रीजरचा शॉक लागून  4 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुकानातल्या आईस्क्रीमच्या फ्रीजरचा शॉक लागून 4 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू.

नाशिकच्या सिडको भागातील घटना

नाशिक प्रतिनिधी  - दुकानातल्या आईस्क्रीमच्या फ्रीजर चा शॉक लागून एका 4 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या सिडको भागात घडली आहे.

पुण्यात टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
बिस बॉसच्या घरात एल्विश यादव ठरला महाविजेता…
आठ महिन्‍याच्‍या बाळाचे अपहरण करत अडीच लाखात सौदा

नाशिक प्रतिनिधी  – दुकानातल्या आईस्क्रीमच्या फ्रीजर चा शॉक लागून एका 4 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या सिडको भागात घडली आहे. वडिलांनसोबत आईस्क्रीम घ्यायला ही चिमुरडी दुकानात गेली होती. ग्रीष्मा विशाल कुलकर्णी वय चार वर्षे अस या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव असून या घटनेने कुलकर्णी कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.  त्रिमूर्ती चौकातील मातोश्री चौक येथील ही घटना आहे. या घटनेने नाशिक शहरात हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटनेबाबत अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

COMMENTS