Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धुळ्यात मेणबत्ती कारखान्याच्या स्फोटात 4 महिलांचा मृत्यू

धुळे/प्रतिनिधी ः धुळ्यामध्ये मेणबत्ती निर्मितीच्या कारखान्यात झालेल्या स्फोटामध्ये 4 महिलांचा मृत्यू झाला असून, 2 कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

शाहू महाराज छत्रपती लढणार लोकसभा ?
राजकोट किल्ल्यावर रविवारी जाणार ः मनोज जरांगे
भाजप खासदार उन्मेष पाटलांनी बांधले शिवबंधन

धुळे/प्रतिनिधी ः धुळ्यामध्ये मेणबत्ती निर्मितीच्या कारखान्यात झालेल्या स्फोटामध्ये 4 महिलांचा मृत्यू झाला असून, 2 कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नंदुरबार येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
धुळ्यातील भवानी सेलिब्रेशन या मेणबत्ती निर्मिती करणार्‍या कारखान्यात मंगळवारी दुपारी अचानक स्फोट झाला. धुळ्यातील साक्री तालुक्यातील चिपलीपाडा येथे हा कारखाना आहे. या भीषण स्फोटात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर तेथील दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. या भीषण स्फोटामागील कारण अद्याप कळू शकलेले नाही. या कारखान्यात काम करणार्‍या चार महिलांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला. तर दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

COMMENTS