Homeताज्या बातम्यादेश

उत्तरप्रदेशात अपघातात नवरदेवासह 4 जणांचा मृत्यू

लखनौ ःउत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग-91 च्या सुन्ना कालव्याच्या पुलावर भरधाव कारने दुभाजकाला जोरा

वसईत स्कूटीवरील दोन भावांना कारने उडवले
समृद्धीवरील अपघातात माजी रणजीपटूचा अपघात
गुजरात मधील आणंद जिल्ह्यात भीषण अपघात

लखनौ ःउत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग-91 च्या सुन्ना कालव्याच्या पुलावर भरधाव कारने दुभाजकाला जोरादर धडक दिली. या अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले आहे. कारमधील सर्वजण लग्नासाठी गावाकडे निघाले होते. त्याचवेळी ही भीषण अपघाताची घटना घडली. मृतांमध्ये नवरदेवासह 4 जणांचा समावेश आहे. या अपघाताचा तपास उत्तर प्रदेश पोलिसांकडून सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कारमधील सर्वजण दिल्लीवरून मैनपुरीला जात होते. राष्ट्रीय महामार्ग-91 च्या सुन्ना कालव्याच्या पुलावर येताच चालकाचा कारवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला.  

COMMENTS