Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव शहरातील रस्त्यांसाठी 4.65 कोटीची मान्यता

आमदार आशुतोष काळे यांची माहिती

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव शहराला चेष्टेने धुळगाव असे संबोधले जायचे. ही ओळख पुसण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नातून कोपरगाव शहराच्या बहुतांशी मुख्य

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता ते आश्‍वासन पूर्ण करतील : अण्णा हजारे यांनी व्यक्त केला विश्‍वास
गुरुपौर्णिमेनिर्मित्त साईचरणी 7 कोटींची गुरुदक्षिणा अर्पण
अवैध पाणी कनेक्शन्स तोडले…मनपा अभियंत्याचे जाहीर कौतुक

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव शहराला चेष्टेने धुळगाव असे संबोधले जायचे. ही ओळख पुसण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नातून कोपरगाव शहराच्या बहुतांशी मुख्य रस्त्यांचा प्रश्‍न मागील साडेतीन वर्षात सोडविला असून कोपरगावची धूळगाव ओळख पूसण्यात यश मिळाले असून शहराच्या विविध रस्त्यांना पुन्हा एकदा 4.65 कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव शहराच्या विकासासाठी आ.आशुतोष काळे यांनी शेकडो कोटीचा निधी देवून शहरातील रहदारीच्या दृष्टीने महत्वाच्या असणार्‍या अनेक मुख्य रस्त्यांना देखील निधी देवून नागरिकांना रस्त्याच्या येणार्‍या अडचणी  दूर केल्या आहेत.कोपरगाव शहराचा पाणी प्रश्‍न कायमचा सोडविण्यासाठी 5 नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी 131.24 कोटी व कोपरगाव शहरातील रस्ते,शहर सुशोभीकरण, स्मशानभूमी विकास,शासकीय इमारती यासाठी आजपर्यंत 12 कोटी पेक्षा जास्त निधी दिला आहे. कोपरगाव शहराच्या मुख्य रस्त्याबरोबरच या रस्त्यांना जोडणार्‍या अनेक रस्त्यांची देखील मोठी दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांना घरापासून मुख्य रस्ता गाठणे त्रासदायक ठरत होते.त्यामुळे मुख्य रस्त्यांना जोडणार्‍या रस्त्यांचा देखील विकास होणे गरजेचे होते व नागरिकांनी देखील आ.आशुतोष काळे यांच्याकडे या रस्ते दुरुस्तीचे गार्‍हाणे मांडले होते. त्याची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी  विशेष रस्ता अनुदान योजनेतून कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील या रस्त्याच्या कामांना 4.65 कोटीची प्रशासकीय मान्यता मिळविली आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 14 मधील गोदावरी नदीवरील छोटा पूल ते मोहनीराज नगरचा मुख्य रस्ता डांबरीकरण करणे,नगरपरिषद हद्दवाढ भागातील गवारेनगर तारांगण शॉप ते यमुना बिल्डिंग ते सिनगर बिल्डिंग ते साई यमुना बिल्डिंग कॉर्नर ते रॉयल ड्रीम सिटी पर्यंत 700 ते 800 मीटर रस्त्याचे डांबरीकरण करणे,द्वारका नगरी यांची घरासमोरील काका कोयटे यांचे घरासमोरील सुतार लोहार कार्यालयापासून ते शंकर नगर मध्ये लोहार सर घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे,नगरपरिषद हद्दवाढ भागातील गवारेनगर भागात गवारे नगर भागात अनवर शेख घर ते कटारे घरापर्यंत 300 ते 400 मीटर रस्त्याचे डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक 01 मध्ये समता नगर भागात गायकवाड घर ते पाटोळे घरापर्यंत 500 मीटर रस्त्याचे डांबरीकरण करणे,प्रभाग क्रमांक 03 मध्ये महाजनगरते घर ते आर के इंजीनिअरिंग पर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, हिराबाई लाड घर ते शिंदे घरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, प्रभाग क्रमांक 04 मध्ये वडांगळी वस्ती ते शेखर राहणे वस्ती पर्यंत 500 मीटर रस्त्याचे डांबरीकरण करणे,प्रभाग क्रमांक 04 मध्ये जाकीर भाई घर ते अमोल शर्मा घर डीपी रस्ता 400 मीटर रस्त्याचे डांबरीकरण करणे आदी रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. या रस्त्यांच्या कामाच्या निधीला तांत्रिक मान्यता मिळाली असून लवकरच प्रशासकीय मान्यता मिळेल व या रस्त्यांच्या कामांना प्रारंभ होऊन नागरिकांची अडचण दूर होणार आहे त्यामुळे नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

COMMENTS